वालुकागिरी
वाऱ्याच्या संचयनकार्यामुळे वालुकागिरीची निर्मिती होते. वाळवंटी प्रदेशात खनन झालेले पदार्थ वारा आपल्याबरोबर वाहून नेतो व वाऱ्याचा वेग जेथे कमी होतो तेथे या सर्व पदार्थाचे संचयन होते. वाऱ्याच्या अशा संचयनामुळे वाळूच्या टेकडय़ांची निर्मिती होते. अशा टेकडय़ांना 'वालुकागिरी' असे म्हणतात. अशा टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरुद्ध बाजू तीव्र उताराची असते. वालुकागिरीची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरुद्ध बाजू तीव्र उताराची असते. वालुकागिरी वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकत असतात. म्हणजेच वालुकागिरींचे स्थलांतर होत असते.
वालुकागिरीची उंची जास्तीत जास्त २० ते ३० मी. किंवा काही वेळा त्यापेक्षा जास्त असू शकते.