Jump to content

वाली

कंपनी परंपरेने चितारलेले वालीचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स.च्या १९व्या शतकाचा पूर्वार्ध)

रामायणानुसार वाली (संस्कृत: वालिन् / वालि; भासा इंडोनेशिया आणि जावी: Subali, सुबाली; मलय: Balya, बाल्या; थाई भाषा: พาลี, भाली; लाओ भाषा: बालीचन्;) हा वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. हा इंद्राचा पुत्र व वानरराज सुग्रीवाचा थोरला भाऊ होता. प्रसंगोपात उद्भवलेल्या गैरसमजातून हा व सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले. याने सुग्रीवाला किष्किंधेतून हाकून लावले व त्याच्या पत्नीचे, अर्थात रुमेचे हरण केले. पुढे रामाच्या साहाय्याने सुग्रीवाने याचा निप्पात केला व याच्यापश्चात सुग्रीव किष्किंधेचा राजा बनला.

यास तारा नामक पत्नी व अंगद नावाचा पुत्र होता.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत