वारे
* वारे हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकङून कमी दबाच्या प्रदेशाकङे भूपृष्ठालगत क्षितिज समांतर वाहणारया हवेच्या झोतास वारा म्हणतात. वाऱ्याचे प्रमुख चार प्रकार 1. गृहिय वारे 2. हंगामी वारे 3. स्थानिक वारे 4. आवर्त व प्रत्यावतॆ वारे
गृहीय वारे - भूपृष्ठावर जास्त वायुभार पट्टयांकडून कमी वायुभार पट्टयांकडे उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात आपल्या डावीकडे वळून वाहणाऱ्या नित्य वाऱ्यांना गृहीय वारे म्हणतात .या वाऱ्यानांच नित्य वारे किंवा प्रचलित वारे असे म्हणतात .
गृहीय वाऱ्यांचे ३ प्रकार पडतात .
१) व्यापारी वारे _ उपोषण जास्त वायुभर पटट्यांकडून विषुववृत्तीय कमी वायुभार वाऱ्यानं व्यापारी वारे म्हणतात.व्यापारी वाऱ्याचे त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून २ उपप्रकार पडतात. ते खालील प्रमाणे :-
१) उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे २) दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे
२) पश्चिमी वारे किंवा प्रतीव्यापारी वारे - उपोषण जास्त वायुभर पत्त्यांक्डून उप्धृवीय कमी वायुभर पत्त्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यानं पश्चिमी वारे म्हणतात .हे वारे व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे त्यांना प्रतीव्यापारी वारे असे म्हणतात. याचे २ प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे -
१) उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतीव्यापारी वारे
२) दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतीव्यापारी वारे
३) ध्रुवीय वारे किंवा पूर्वीय वारे - ध्रुवीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून समशीतोष्ण कमी दाबाच्या पत्त्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यानं दृवीय वारे असे म्हणतात .या वाऱ्यांचे उत्तर धृवीय वारे व दक्षिण दृवीय वारे असे २ प्रकार पडतात .
स्थानिक वारे: जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परि्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित शेत्रात वाहतात , त्यांना स्थानिक वारे आसे म्हणतात. स्थानिक वाऱ्याचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो . हे वारे वेगवेळ्या नावानी ओळखले जातात. त्यांतील प्रमुख खलीलप्रमाणे आहेत. १) दरीय वारे व पर्वतीय वारे: दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्यामानाने दरितील हवा तापलेली नसते. या वेळी दरिशेत्रात शिखर भागापेक्षा वयुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात.