वाराही कंद
वाराही कंद किंवा पंचपत्री (लॅटिन नाव:डायोस्कोरिया पेंटाफिला) ही कंद वर्गीय वेलीची एक प्रजाती आहे. इंग्रजी भाषेत हिला फाइव्हलीफ याम या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती दक्षिण आणि पूर्व आशिया (चीन, भारत, इंडोचायना, इंडोनेशिया, फिलीपिन्स इ.) तसेच न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलियात उगवते. ही वेल जंगली असली तरी अनेक ठिकाणी हीची अन्न आणि आयुर्वेदिक औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.[१][२][३]
ही एक काटेरी वेल असून इतर वनस्पतींभोवती घड्याळाच्या उलट दिशेने चढत जाते. पूर्ण वाढलेल्या वेलीची लांबी १० मीटर (म्हणजे ३० फुट) पर्यंत आढळून येते. या वेलीची पाने संयुक्त असुन वेलीच्या भोवताली विरुद्ध दिशेने वाढलेली असतात. पाने ३ ते ५ पत्रकांमध्ये विभागलेली असतात. वेलीवर सुमारे एक सेंटीमीटर लांब घोड्याच्या नालच्या आकाराचे कंद उगवतात. हे कंद पावसाळ्यात जमिनीत लावले असता त्यातून नवीन वेल उगवते. फुले अणकुचीदार टोकांमध्ये उमलतात. या वेलीच्या मुळाशी असणारे घनकंद परत जमिनीत लावले असता त्यातून देखील नवीन वेल उगवते. वेलीवरील कंद असो की मुळाशी असणारे घनकंद, हे दोन्ही औषधी तसेच पौष्टिक अन्न म्हणून देखील खाल्ले जातात.[३][४][५]
विविध भाषेतील नावे[६]
- मराठी : शेंडवेल, गाबोळी, मुंडावळया
- कोंकणी : तीळ करंडी
- हिंदी : कांटा आलू
- संस्कृत : कण्टकालुकः , वाराही कंद
- नेपाळी : मिठे तरुल
- गुजराती : नानो जंगली कंद, वंजू कंदू, वेनी वेल
- तेलुगू : अडवी गिनुसु तीगा
- कन्नड : काडू गुंबला
- तमिळ : नूरई, काट्टुवल्ली, वल्ली कुडी
- मल्याळम : नेयनुरा, नाल्लेमोरा
- ओडिया: कोंतालु
- बांगला : काटा आलू
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Samanta, A.K. (2006). The genus Dioscorea L. in Darjeeling and Sikkim Himalayas - a census. Journal of Economic and Taxonomic Botany 30: 555-563.
- ^ Govaerts, R., Wilkin, P. & Saunders, R.M.K. (2007). World Checklist of Dioscoreales. Yams and their allies: 1-65. The Board of Trustees of the Royal Botanic Gardens, Kew.
- ^ a b "वाराही कन्द". ८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ Dioscorea pentaphylla. Archived 2016-03-04 at the Wayback Machine. University of Michigan Ethnobotany.
- ^ "वाराही कंद के फायदे, उपयोग, औषधीय गुण और नुकसान" (हिंदी भाषेत). ७ डिसेंबर २०२३ रोजी पाहिले.
- ^ "five leaf yam". ९ मार्च २०२४ रोजी पाहिले.