Jump to content

वारंवारता

वेगवेगळ्या वारंवारतांचे ज्या-वक्रीय तरंग; खालच्या तरंगांच्या वारंवारता वरच्या तरंगांपेक्षा अधिक आहेत. आडवा अक्ष काळ दर्शवतो.

वारंवारता (इंग्रजी : Frequency - फ्रिक्वेन्सी) (किंवा कंप्रता) म्हणजे एखाद्या आवर्तनशील गोष्टीच्या आवर्तनांची काळाच्या एका एककातील संख्या होय. आवर्तनशील गोष्टीच्या एका आवर्तनाला लागणाऱ्या कालावधीला आवृत्तिकाल[श १] म्हणतात. अर्थातच, वारंवारता आवृत्तिकालाच्या व्यस्त असते.

व्याख्या व एकक

व्याख्येनुसार वलन, दोलन किंवा तरंग इत्यादी आवर्ती प्रक्रियांसाठी काळाच्या एका एककात घडणाऱ्या आवर्तनांची संख्या, म्हणजे वारंवारता होय. भौतिकशास्त्रअभियांत्रिकी यांच्या प्रकाशविज्ञान, ध्वनिशास्त्र, रेडिओ इत्यादी शाखांमध्ये वारंवारतेचे चिन्ह म्हणून f हे रोमन अक्षर किंवा (न्यू) हे ग्रीक अक्षर वापरतात.
SI एककांमध्ये वारंवारतेसाठी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हाइनरिश हर्ट्‌झ यांच्या नावाने हर्ट्‌झ (Hz) हे एकक वापरतात. उदा.: १ Hz म्हणजे एका सेकंदात एक आवर्तन.
आवृत्तिकाल दर्शवण्यासाठी हे रोमन अक्षर वापरतात. आवृत्तिकाल हा वारंवारतेचा व्यस्त असतो : : आवृत्तिकालासाठी सेकंद हे SI एकक वापरतात.

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ आवृत्तिकाल (इंग्रजी: Time period - टाईम पीरियड)