Jump to content

वायुसेना अकादमी

दुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ
आहसंवि: नाही.आप्रविको: VODG
माहिती
विमानतळ प्रकार वायुसेना
प्रचालक भारतीय वायुसेना
स्थळ हैदराबाद, भारत
समुद्रसपाटीपासून उंची २,०१३ फू / ६१४ मी
गुणक (भौगोलिक)17°37′38″N 078°24′12″E / 17.62722°N 78.40333°E / 17.62722; 78.40333गुणक: 17°37′38″N 078°24′12″E / 17.62722°N 78.40333°E / 17.62722; 78.40333
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१०आर/२८एल ६,८०० २,०७३ डांबरी
१०आर/२८एल ८,२५० २,५१५ कॉंक्रिट

दुंडीगुल वायुसेना अकादमी विमानतळ (आहसंवि: नाहीआप्रविको: VODG) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील दुंडीगुल येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे.

भारताची एरफोर्स ऍकेडमी ही हैदराबादसिकंदराबाद या जुळ्या शहरांपासुन सुमारे २५ कि.मी दूर, दुंडीगुल मधे आहे.येथे अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय आहे.येथे त्यांना एक सफल म्होरक्या बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना भारतीय वायुसेनेच्या विविध शाखांमध्ये उच्चपद बहाल करण्यात येते.दुंडीगुल येथील प्रशिक्षण कोणत्याही गोष्टींचा सामना करण्यास त्यांचा पाया मजबूत करते.वेगवेगळ्या टप्प्यात, अननुभवी युवकांना विमानाचे उड्डाण शिकविण्यात येते.जे लढाउ वैमानिक म्हणुन उत्तीर्ण होतात,त्यांना एसयु-३० ,मिग-२९, मिग-२७ , मिग-२३ , मिग-२१ , मिराज-२००० ,जग्वार आदी विमानांचा उपयोग करून,लढाउ स्क्वाड्रन मध्ये पहिल्या फळीत सेवा करण्याची संधी मिळते.ज्या कोणास वाहतूक विमान चालविण्यात रस आहे,ते भारतीय वायुसेनेचे अधिकारी,अवजड अनेक इंजिन असलेले एच एस-७४८ व दोन इंजिने असलेले अष्टपैलु, अनेक भूमिका बजावु शकत असलेले एएन-३२ वाहतूक विमान किंवा डॉर्नियर जातीचे हलके व उपयुक्त वाहतूक विमान उत्कृष्टरित्या चालवु शकतात. या व्यतिरिक्त, हेलिकॉप्टर चालविण्याचा एक पर्याय आहेच.हेलिकॉप्टरच्या पथकात दाखल होउन प्रशिक्षणार्थी हे केवळ झाडांच्या उंचीइतक्या उंचावरून व अत्यंत छोट्या व दूरवरच्या न बघितलेल्या क्षेत्रांमध्ये ते उडवु/उतरवु शकतात. यात,हेलिकॉप्टर गनशिप चालविणे,एम आय-२६ जातीचे मोठे व अधिक उद्वाहक क्षमतेचे हेलिकॉप्टर चालविणे,आकस्मिक परिस्थितीत जखमींची वाहतूक,पॅराश्युटने पथके उतरविणे व हवाईमार्गे मदतसामग्री पोचविणे इत्यादींचा समावेश असतो. वायुसेनेच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रातील कामात युवक व युवतींना अग्रणी भूमिका बस्जाविण्यासाठी ही अकादमी विशेष प्रशिक्षण देते.ते आहेत प्रशासकिय,हवाई नियंत्रण,वाहतूक,हवामानशास्त्र,लेखा व शिक्षण शाखा.कोणत्याही निवडलेल्या क्षेत्रास न ग्रह्य धरता, प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा ड्रिल मास्तरच्या ढोलाच्या ठोक्यावर,शारीरिक शिक्षणाच्या मैदानावर एकसमयावच्छेदेकरून कवायती करतात.पोहणे, घोड्यावरची रपेट,मैदानी व बैठे खेळ हे संध्याकाळच्या सत्रात होतात.याने सैनिकासाठी हवे असलेले शारीरिक बळ त्यांना प्राप्त होते.येथेच त्यांना सैनिकांसाठी असलेले अंतर्मन तयार करता येते.

प्रशिक्षण

ही अकादमी किनारा रक्षक दल व नौसेनेचे अधिकारी तसेच हवाईदलाच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देते.मित्र देशांच्या अधिकाऱ्यांना कधी-कधी येथे प्रशिक्षण देण्यात येते. खाली येथे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे प्रकार देण्यात आले आहेत-

उड्डाण प्रशिक्षण :

जर आपण उड्डाण शाखा निवडली असल्यास,प्रशिक्षण तीन टप्प्यात देण्यात येते-टप्पा-१,टप्पा-२,टप्पा-३.प्रत्येक टप्पा आपणास प्राथमिक ते जास्त विमानोड्डाणाच्या कठिण स्तरापर्यंत घेउन जातो.तीसऱ्या टप्प्यात वैमानिक लढाउ विमान,हेलिकॉप्टर व वाहतूक विमान उडविण्याच्या विशेष अभ्यासात पाठविले जातात.

हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : हवाई वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण हे 'आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेच्या' पद्धती प्रमाणे तयार करण्यात आले आहे.हवाई दलाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यात योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत.

थळ-कार्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : थळ-कार्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे विशेष प्रशिक्षण हवाई दलाच्या सर्व गैर-तांत्रिक शाखांसाठी आयोजिल्या गेले आहे.जर आपण प्रशासकिय,हवाई नियंत्रण,वाहतूक,हवामानशास्त्र,लेखा व शिक्षण शाखेत प्रवेश घेतला असल्यास आपणास तेथे हवाई दलात 'थळ अधिकारी' म्हणुन रुजु होण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण दिल्या जाते.

जोड सेवा प्रशिक्षण : उड्डाण,तांत्रिक व थळ-कार्य क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना येथे सहा आठवड्यांच्या जोड-सेवेचे प्रशिक्षण दिल्या जाते.नंतर,जाळाहळ्ळी,बंगलोर येथील हवाई अभियांत्रिकी शाखेसाठी निवडलेल्यांना तेथे पाठविले जाते.या प्रशिक्षणात, सामान्य सेवेबाबतचे विषय जसे-प्रशासन व सेवा-ज्ञान याचा अंतर्भाव आहे.

बाह्य दुवे