वायुधारित वीजनिर्मिती प्रकल्प
वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प हा वीजनिर्मितीचा व्यवहार्य पर्याय आहे असे मानले जाते. या ऊर्जा प्रकल्पामध्ये नैसर्गिक वायूच्या उच्चदाबावरील ज्वलनांतून उष्णतेची निर्मिती केली जाते. वायुजनित्रांत (इंग्लिश: Gas Turbo Generator) घडणाऱ्या या प्रक्रियेतून वीजेची निर्मिती होते. याच प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित वायूंचा पुनर्वापर करून त्याद्वारे बाष्पधारित जनित्रांतून (इंग्लिश: Steam Generator) अतिरिक्त वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत वायूच्या ८५% पर्यंतचे वस्तुमानाचे उष्मात आणि पर्यायाने विजेत रूपांतर केले जाते.
वाहतूक
या प्रकल्पासाठी लागणारा नैसर्गिक वायूचे द्रवरूपात रूपांतर करून वायुक्षेत्रापासून वीजप्रकल्पापर्यंतची वाहतूक आणि हाताळणी सोईस्करपणे करता येते.
प्रकल्प
महानिर्मिती (इंग्लिश: MahaGenco)चा उरण प्रकल्प, रत्नागिरी गॅस आणि पॉवरचा दाभोळ प्रकल्प असे मोठे वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.
हे सुद्धा पहा
- वीज निर्मिती
- औष्णिक वीज प्रकल्प
- अणुभट्टी