वायली पोस्ट
वायली हार्डमन पोस्ट (२२ नोव्हेंबर, १८९८:कोरिंथ, टेक्सास, अमेरिका - १५ ऑगस्ट, १९३५:पॉइंट बॅरो, अलास्का, अमेरिका) हे एक अमेरिकन वैमानिक होते. हे एकट्याने विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले वैमानिक होते. यांना जेट स्ट्रीमचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते.
पोस्ट हे अमेरिकेतील मूळ रहिवाशांपैकीच्या चेरोकी जमातीतील होते.