वाय (चित्रपट)
वाय | |
---|---|
दिग्दर्शन | अजित सूर्यकांत वाडीकर |
निर्मिती | कंट्रोल एन प्रॉडक्शन (विराज मुनोत) |
पटकथा | अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ |
प्रमुख कलाकार | मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते |
संवाद | अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते |
संकलन | जयंत जठार |
छाया | राकेश भिलारे |
संगीत | पराग छाबरा |
ध्वनी | पियुष शाह |
वेशभूषा | अनुत्तमा एस एन |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २४ जून २०२२ |
वितरक | ए ए फिल्म्स (मुक्ता बर्वे) |
वाय हा 'कंट्रोल एन प्रॉडक्शन' द्वारे निर्मित 'वास्तव-थरार' मराठी चित्रपट असून हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.[१]
याची पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.
चित्रपटाची झलक १३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या चित्रपटात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते इत्यादी अभिनेत्यांच्या भूमिका असल्याचे दिसून येत आहे.[२]
निर्मिती
या चित्रपटाची निर्मिती 'कंट्रोल एन प्रॉडक्शन' या संस्थेची असून या चित्रपटाचे दिग्दर्शन 'अजित सूर्यकांत वाडीकर' यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीस २०२१ साली सुरुवात झाली होती.[२]
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी खुन होत असून त्याचा उलगडा मुक्ता बर्वे या चित्रपटात करताना दिसत आहेत.[१]
या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी सहित इतर कलाकार असून कलाकारांचे नाव आणि कथानक याचे प्रदर्शनापूर्वी गुपित ठेवल्या गेले आहे.
चित्रपटाबद्दल अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणतात,
'वाय' चा अर्थ काय हे चित्रपटातून कळेलच. 'वाय' हे केवळ एक अक्षर नसून त्यामागे स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा लढा आहे.[३]
'वाय' चे दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात,
'वाय' या अक्षरामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. हाच संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही 'वाय' मधून करत आहोत आणि यात आम्हाला मराठी सिनेसृष्टीची साथ मिळतेय, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.[३]
संदर्भ
- ^ a b "मुक्ता बर्वेची साहसी भूमिका असलेल्या 'वाय' या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज". etvbharat.com. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "'वाय' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला". mymahanagar.com. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "'वाय' नक्की आहे तरी काय? मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी यांनी शेअर केला पोस्टर, भानगड काय आहे? पाहा..." TV9 Marathi. १८ जून २०२२ रोजी पाहिले.