वाय.एस. राजशेखर रेड्डी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ८, इ.स. १९४९ Pulivendula | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २, इ.स. २००९ आंध्र प्रदेश | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
वाय.एस. राजशेखर रेड्डी ( जुलै ८,इ.स. १९४९ म्रूत्यू सप्टेंबर २ इ.स. २००९) हा काँग्रेस पक्षाचा नेते आणि इ.स. २००४ ते मृत्यूपर्यंत आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री होते. २ सप्टेंबर २००९ रोजी एका सर्वेक्षणासाठी गेले असताना त्यांच्या हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात ते मृत्यू पावले
खाजगी जीवन
रेड्डीच्या पत्नीचे नाव विजया लक्ष्मी आहे.[१] त्यांचा मुलगा वाय.एस. जगन मोहन रेड्डी राजकारणी आहे. हा कडप्पा लोकसभा मतदारसंघातून ५ लाखापेक्षा जास्त बहुमताने निवडून आला.[२][३] राजशेखर रेड्डीला शर्मिला नावाची एक मुलगीही आहे. राजशेखर रेड्डीचा भाऊ वाय.एस. विवेकानंद रेड्डी काँग्रेसचा पुढारी आहे.
राजशेखर रेड्डीचे कुटुंब ख्रिश्चन असून [४] त्याने बेथलेहेमसह अनेक ख्रिश्चन तीर्थस्थळांची अनेकदा यात्रा केली होती. याशिवाय तो तिरुपतीचीही नियमीतपणे यात्रा करीत असे.[२][५][६].
मृत्यू
प्रशासन गावापर्यंत या मोहिमेवर निघालेले रेड्डीचे हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास बेपत्ता झाले. त्या वेळी रेड्डी यांच्यासोबत मुख्य सचिव ए. सुब्रह्मण्यम आणि मुख्य सुरक्षा अधिकारी ए.एस.सी. वेस्ली आणि दोन वैमानिकही होते. चित्तूरकडे निघालेले हे हेलिकॉप्टर कनुर्लपासून पुढे गेल्यानंतर दिशा बदलून पूर्वेला आत्माकूडच्या दिशेने गेले. वेलुगोडु आणि संतजुडुरु या दोन गावांच्यामध्ये असलेल्या डोंगरावरील झाडावर ते आदळले आणि कोसळले. त्याचे वेळी स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. मृत्यूपश्चात राजशेखर रेड्डीला संपूर्ण सरकारी इतमामासह ख्रिश्चन पद्धतीनुसार दफन करण्यात आले.[७]
आंध्र प्रदेश सरकारने कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलून वायएसआर कडप्पा जिल्हा असे ठेवले आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "More cheap rice, free power". Indian Express. 21 May 2009. June 12, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b "YSR leaves for pilgrimage to Israel". The Hindu. Chennai, India. 27 May 2009. 2011-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 3, 2009 रोजी पाहिले.
- ^ "'Shooting' for posterity". The Hindu. Chennai, India. 16 August 2004. 2004-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 3, 2009 रोजी पाहिले.
- ^ Sai, J S (7 September 1999). "In Cuddapah, YSR is king". Rediff. 10 September 2009 रोजी पाहिले.
- ^ P Neelima (4 September 2009). "A Christian, YSR a regular at Tirumala". Times of India. 2009-09-05 रोजी पाहिले.
- ^ Venkatesha Babu. "YS Rajasekhara Reddy : A tiger who will roar no more". Mint Lounge. HT Media. 2009-09-05 रोजी पाहिले.
- ^ "YSR buried with full state honour in Idupulapai". 2011-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-21 रोजी पाहिले.