Jump to content

वामनराव सडोलीकर

पं. वामनराव सडोलीकर (१६ सप्टेंबर, इ.स. १९०७ - इ.स. १९९१) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत.


पूर्वायुष्य

पं. वामनराव सडोलीकरांचा जन्म कोल्हापूर येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले.


सांगीतिक कारकीर्द

त्यांनी मराठी संगीत नाटकाच्या रंगभूमीवर गायक-अभिनेता, संगीत दिग्दर्शक व दिग्दर्शक अशा अनेक पदरी भूमिका निभावल्या. त्यांनी अनेक चित्रपटांतही काम केले.


शिष्य

त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो.


पुरस्कार व सन्मान

  • इ.स. १९३८ मध्ये गंधर्व महाविद्यालय, लाहोर यांकडून 'संगीत प्रवीण' सन्मान
  • आय टी सी संगीत संशोधन संस्थेची(ITC SRA-Imperial/Indian Tobacco Company Ltd's Sangeet Research Academy) फेलोशिप
  • मराठी नाट्य परिषदेकडून बालगंधर्व सुवर्णपदक


बाह्य दुवे

वामनराव सडोलीकरांविषयी इंग्लिश मजकूर