वामन शिवराम आपटे
वामन शिवराम आपटे | |
---|---|
जन्म | असोलोपोल सावंतवाडी |
मृत्यू | ९ ऑगस्ट १८९२ पुणे |
भाषा | मराठी |
वामन शिवराम आपटे (जन्म : असोलोपोल (सावंतवाडी संस्थान), इ.स. १८५८; - पुणे (महाराष्ट्र, ९ ऑगस्ट इ. स. १८९२) हे संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकार व मराठी लेखक होते. त्यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश इ.स. १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश इ.स. १८९० साली प्रकाशित झाला.
जीवन
आपट्यांचा वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांच्या आईने मुलांना घेऊन कोल्हापूर गाठले व तेथे मुलांना शाळेत घातले. परंतु लवकरच (अंदाजे इ.स. १८६९ साली) आपट्यांच्या आईचे व थोरल्या भावाचेदेखील निधन झाले. राजाराम हायस्कुलाचे मुख्याध्यापक एम.एम. कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीच्या आधारावर आपटे इ.स. १८७३ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए. (इ.स. १८७७) व एम.ए. (इ.स. १८७९) पदव्या मिळवल्या.
शिक्षणानंतर इ.स. १८८० साली सहाध्यायी असलेल्या बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पर्यवेक्षकपदावर ते रुजू झाले. पुढे ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्येही शिकवत होते.
शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतरे त्यांनी केली. हा संपूर्ण शेक्सपिअर एकूण ५ खंडांत प्रसिद्ध झाला..
ऑगस्ट ९, इ.स. १८९२ रोजी टायफॉइडामुळे आपट्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
आपट्यांचे संस्कृत कोश
- इंग्रजी-संस्कृत शब्दकोश
- संस्कृत-इंग्रजी शब्दकोश
- संस्कृत-मराठी शब्दकोश
- मुलांसाठी शालेय संस्कृत-मराठी शब्दकोश
वा.शि.आपट्यांनी मराठीत आणलेली शेक्सपियरच्या नाटकांची पुस्तके (अपूर्ण यादी)
- संपूर्ण शेक्सपिअर : अथेन्सचा टिमॉन
- संपूर्ण शेक्सपिअर : ऑटनी व क्लिओपत्रा
- संपूर्ण शेक्सपीअर : कॉमेडी ऑफ एरर्स.
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग जॉन
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग रिचर्ड द सेकंड
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग रिचर्ड द थर्ड
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग हेन्री द एड्थ (?)
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग द हेन्री द फिफ्थ
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग द हेन्री फोर्थ भाग १
- संपूर्ण शेक्सपिअर किंग द हेन्री फोर्थ भाग २
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग हन्री द सिक्स्थ भाग २
- संपूर्ण शेक्सपिअर : किंग हेन्री द सिक्स्थ भाग ३
- संपूर्ण शेक्सपीअर : कोरोओलियनस्.
- संपूर्ण शेक्सपीअर : चतुरगडच्या विनोदी स्त्रिया
- संपूर्ण शेक्सपीअर : ज्युलियस सिझर
- संपूर्ण शेक्सपीअर : झुंझारराव : अथेल्लो
- सपूर्ण शेक्सपीअर : टायटस अॅड्रामिक्स.
- सपूर्ण शेक्सपीअर : ट्रेलिस व क्रिसिडा
- संपूर्ण शेक्सपिअर : प्रस्तावना.
बाह्य दुवे
- वा.शि. आपटे : एका शिक्षकाची यशोगाथा व शोककथा; ले.: डॉ. यशवंत रायकर; प्र.: लोकसत्ता ; दि. १६ जुलै, इ.स. २०१० (मराठी मजकूर)
- वामन शिवराम आपटेकृत संस्कृत-इंग्लिश शब्दकोश (संस्कृत व इंग्लिश मजकूर)