वातव्याधी
वातव्याधी म्हणजे वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी होय.[१]
लक्षणे
- हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
- हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
- अंगावर अकारण काटा येतो.
- अकारण बडबड केली जाते.
- पाय, पाठ व डोके आखडते.
- पाठीला कुबड येते.
- मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
- अंगावर सूज येते.
- झोप कमी येते.
- गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
- पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्ती कमी होते.
- स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
- संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
- मान ताठ राहत नाही, डोक्यात तीव्र वेदना होतात.
- गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
- डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
- सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.
संदर्भ
- ^ वातव्याधीचे निदान Archived 2012-03-13 at the Wayback Machine. डॉ. श्री बालाजी तांबे, सकाळ