वाढदिवस
जयंती (इंद्र कन्या) याच्याशी गल्लत करू नका.
वाढदिवस हा वापरात असणाऱ्या दिनदर्शिकांनुसार (जिवंत) व्यक्तीच्या जन्मापासून पूर्ण वर्षांनी येणाऱ्या विशिष्ट तारखेला येतो.
भारतीय पारंपरिक प्रथा
- वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे.
- ज्याचा वाढदिवस असेल, तो आंघोळीनंतर आई-वडील, तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करतो.
- ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करतात. (त्याला तुपाच्या दिव्याने ओवाळतात.)
- औक्षण झाल्यावर वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर अक्षता टाकतात.
- वाढदिवस असलेल्याला खाण्यास गोड पदार्थ देतात.
- वाढदिवस असलेल्यांसाठी शुभेच्छा देतात.
- ज्याचा वाढदिवस असेल त्याला एखादी भेटवस्तू आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
जयंती
थोर पुरुष, संत/महात्मा वा आदरणीय व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजे जयंती. जयंत्यांच्या यादीसाठी जयंत्या पहा.
हे सुद्धा पहा
- जयंत्या