Jump to content

वाडा तालुका

  ?वाडा तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
आमदारदौलत दरोडा
तहसीलवाडा तालुका
पंचायत समितीवाडा तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 421303
• +०२५२६
• MH48

वाडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे.

प्रास्ताविक

(१). हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो.
(२). तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे.
(३). येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते.
(४). येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इत्यादी कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात.
(५). वाडा तालुक्याच्या बाजूला तानसा, भातसा, लोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे शहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत.
(६). या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
(७). महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.
(८). तालुक्यातील कुडूस येथे १०० वर्षांची परंपरा असणारा (उरूस) वार्षिक बाजार भरतो.
(९). या तालुक्यात इ. स.च्या पाचव्या व सहाव्या शतकात ६० फूटX२७ फूट लांबीरुंदीचे कोरीव काम असलेले खंडेश्वर मंदिराचे पुरातन अवशेष होते. तसाच असणारा शिलालेख मुंबईतील म्युझियममध्ये आहे.
(१०). तालुक्यातील मांगरूळ गावी बिटिशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत.
(११). 'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
(१२). कोलीम सरोवर हा या गावाजवळील डोंगरावर असणारा तलाव आहे.
(१३). 'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना दिसतात.
(१४). तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदिर, परशुराम मंदिर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो.
(१५). तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पर्यटन स्थळे आहे.

( १६ ) तालुक्यात अंबिस्ते गावी नागनाथ तीर्थ क्षेत्र आहे. तिथे शंकराच पुरातन मंदिर आहे..महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे खूप मोठी यात्रा भरते.

हवामान

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

लोकजीवन

वाडा तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ६०३ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[]

वाडा तालुक्यातील गावे

  1. आबितघर,
  2. आब्जे,
  3. ऐनशेत,
  4. आखाडा,
  5. आलमाण,
  6. अंबारभुई,
  7. आंभई,
  8. आंबिस्ते बुद्रुक,
  9. आंबिस्ते खुर्द,
  10. आमगाव (वाडा),
  11. आपटी,
  12. आसनास,
  13. आवंढे,
  14. बाळीवळी,
  15. बावळी,
  16. बेरशेती,
  17. भावेहर,
  18. भोपिवली,
  19. बिलावली,
  20. बीलघर,
  21. बिळोशी,
  22. बोरांडे,
  23. ब्राह्मणगाव,
  24. बुधावली,
  25. चांबळे,
  26. चेंदवळी,
  27. चिखळे,
  28. चिंचघर,
  29. दाभोण,
  30. डाहे,
  31. दहिवळी कुंभिस्ते,
  32. डाकिवली,
  33. देसई,
  34. देवळी (वाडा),
  35. देवळी तर्फे कोहज,
  36. देवगाव (वाडा),
  37. देवघर,
  38. दाढरे,
  39. धापड,
  40. डोंगस्ते,
  41. गाळे,
  42. गाळतरे,
  43. गांधरे,
  44. गारगाव (वाडा),
  45. गातेस बुद्रुक,
  46. गातेस खुर्द,
  47. गौरापूर,
  48. घोणसई,
  49. गोळेघर,
  50. गोराड,
  51. गोऱ्हे,
  52. गुहीर,
  53. गुंज (वाडा),
  54. हमरापूर,
  55. हरोसाळे,
  56. जाळे,
  57. जामघर,
  58. कादिवली,
  59. कळंभई,
  60. कळंभे,
  61. कळंभोळी,
  62. कळमखांड,
  63. कांबरे (वाडा),
  64. कंचाड,
  65. कापरी,
  66. करांजे,
  67. करंजपाडा,
  68. कासघर,
  69. काटी,
  70. केळठण,
  71. खैरे आंबिवली,
  72. खैरे तर्फे वाडा,
  73. खानिवली,
  74. खारीवली तर्फे कोहज,
  75. खारीवली तर्फे पौळबार,
  76. खोडदे,
  77. खुपरी,
  78. खुटाळ,
  79. किरवली,
  80. कोळीम सरोवर,
  81. कोंढळे,
  82. कोणे,
  83. कोणसाई,
  84. कुडुस,
  85. कुंंडाळ,
  86. कुर्ळे,
  87. कुयाळु,
  88. लखमपूर,
  89. लोहापे,
  90. मालोंदे,
  91. मांडवा,
  92. मांडे (वाडा),
  93. मांगाठाणे,
  94. मंगरूळ (वाडा),
  95. माणिवळी,
  96. मेट,
  97. म्हासवळ,
  98. मोज,
  99. मुंगुस्ते,
  100. मुसरणे,
  101. नांदणीगायगोठा,
  102. नाणे (वाडा),
  103. नारे,
  104. नेहरोळी,
  105. निचोळे,
  106. निंंबावळी,
  107. निशेत,
  108. ओगाडा,
  109. पाचघर,
  110. पाली (वाडा),
  111. पळसई,
  112. पारळी,
  113. पास्ता,
  114. पेठरंजनी,
  115. फणसगाव,
  116. पिक (वाडा),
  117. पिंपळास,
  118. पिंपरोळी,
  119. पिंजाळ,
  120. पोशेरी,
  121. रायसळगाव,
  122. सांगे,
  123. सापणेबुद्रुक,
  124. सापणेखुर्द,
  125. सापरोंदे,
  126. सारसओहळ,
  127. सारशी,
  128. सासणे,
  129. सातरोंदे,
  130. सावरखांड,
  131. शेळे,
  132. शेळटे,
  133. शीळ,
  134. शिलोत्तर,
  135. शिरसाड,
  136. सोनाळेबुद्रुक,
  137. सोनाळेखुर्द,
  138. सोनशिव,
  139. सुपोंदे,
  140. ठुणावे,
  141. तिळसे,
  142. तिळगाव,
  143. तिळमाळ,
  144. तोरणाई,
  145. तुसे,
  146. उचाट,
  147. उज्जैनी,
  148. उमरोठे,
  149. उसर,
  150. वाडवळी तर्फे गाव,
  151. वाडवळी तर्फे पौळबार,
  152. वाडवळी तर्फे सोनाळे,
  153. वाघोटे,
  154. वैतरणा नगर,
  155. वरईबुद्रुक,
  156. वरईखुर्द,
  157. वारळे,
  158. वारधा,
  159. वारनोळ,
  160. वारसाळे,
  161. वासुरीबुद्रुक,
  162. वासुरीखुर्द,
  163. वावेघर,
  164. वीजापूर,
  165. वीजयगड,
  166. विळकोस तर्फे कोणपटी,
  167. विळकोस तर्फे वाडा,
  168. विर्हे,
  169. झाडखैरे

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html


पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार, दिनांक २४ जुलै २०२४