वाघिवरे
?वाघिवरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर | १,२०८ ♂/♀ |
सरपंच | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • ४१५७०१ • MH08 |
[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]
वाघिवरे हे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - १. मधलीवाडी , २. कदमवाडी, ३. घडशीवाडी, ४. रेवाळेवाडी , ५. भोईवाडी, शिवाय मोहल्ला ही आहे.
श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी माता ही या गावाची ग्रामदेवता आहे.देवीचे मंदिर गावानजीकच्या जंगलात आहे. अलीकडेच ग्रामस्थ आणि देवीभक्तांनी पुढाकार घेऊन मूळ ठिकाणीच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. देवळामध्ये खेम, केदार, सोमेश्वर, चंडिकाई, कालकाई, वाघांबरी, वर्धान आणि मानाई या देवता विराजमान आहेत.
शिमगा (होळी) हा गावदेवीचा मुख्य उत्सव आहे़. या सणाला देवीची पालखी देवळातून गावात येते. पालखी नाचवण्याची रित येथेही उत्साहाने पाळली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी पहाटे होळी (होम) पेटवला जातो. दुपारच्या सुमारास शेजारील बामणोली गावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवीची पालखी वाघिवरे गावच्या देवीची भेट घेण्यासाठी येते. दोन बहिणींच्या भेटीचा हा सोहळा अगदी नयनरम्य असतो.
मधलीवाडीमध्ये श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती निमित्त येथे गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते.
कदमवाडी मध्ये श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. जवळील सभामंडपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.
घडशीवाडीमध्ये नवरात्रीत देवीची स्थापना करण्यात येते.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.