Jump to content

वाघरी बोलीभाषा

Look up वाघरी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
वाघरी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

वाघरी (किंवा वाघडी, बागरी) नावाच्या अनेक बोलीभाषा आहेत. प्रामुख्याने या आदिवासींच्या भाषा आहेत. वाघरी बोलीभाषा मराठी-गुजराती-राजस्थानी यांचे मिश्रण आहे. वाघरी लोकांचा व्यवसाय शिकार करणे, मासे पकडणे आणि जंगलातील उत्पादने गोळा करणे हा असतो.

विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या टाकणकार समाजाच्या बोली भाषेसही वाघरी म्हणजेच वाघारामी बोली म्हणतात.या बोली भाषेवर राजस्थानी व गुजराती भाषांची छाप आहे.[ संदर्भ हवा ]

"शिकार वाघऱ्‍हांची" :-
शिकारीच्या वाघूळला मयटे म्हणतात, मासे पकडण्याच्या जाळ्याला जायू म्हनतात, "ससा" वाघरीमधे (दात्ती)च्या मयठ्याला लावलेल्या काळ्याना मराणी म्हणतात, (दात्ती)च्या मटणाच्या भागाला वेगवेगळी नावे आहेत. मुंडक्याला फासरू म्हणतात; कलेजी (लिव्हर-जठर)ला परमोरी म्हणतात; पायाच्या पंज्याना गोळो म्हणतात. हरिणाच्या जातीला वाघरी भाषेतील नावे : हरणाच्या मादीला बोळी, चिंकाऱ्याला काईट म्हणतात; तितर, बाटी पकडण्याला फांज, झापूल म्हणतात,

वाघरी वाक्यांची उदाहरणे

वाघरी वाक्यमराठी अर्थ
म्हारी बोली वाघरी बोलीमाझी भाषा वाघरी
घना मोठा पावना आया मारां घरंखूप पाहुणे आले माझ्या घरी
बजारती सामान सुमान लावू लागसं आम्ना.बाजारातून सामान सुमान आणावे लागेल आज
बानं पुसीन कपडा लत्ता लावू लागसंबाबांना विचारून कपडे आणावे लागतील
सहो बा मोठा आईनू माहेर क्यानू होतूअहो बाबा, मोठ्या आईचे माहेर कुठे होते?
ते कये आपला घरं आवताबी नयीते कधी आपल्या घरी येत नाहीत.
न्हानी आयीना भाई बी आवता नयीकाकूचे भाऊ पण येत नाहीत
मी तिनो भत्रीजो अश्यापर मालूम नयी मनंमी तिचा पुतण्या असूनही मला माहीत नाही
मारो मामो तिवनां घरं जातोरसंमाझे मामा त्यांच्या घरी जात असतात
पावनो बी तिवना घरं जातोरसंपाहुणेही त्यांच्या घरी जात असतात
ते आपला घर आवता नयीते आपल्या घरी येत नाहीत.
पावना आया की तिवनं पुसीसंपाहुणे आले की त्यांना विचारीन
आमरा घरं समुनही आवताआमच्या घरी का नाही येत
आमहि तुम्हारा घरं आवनारा नहीआम्हीपण तुमच्या घरी येणार नाही
हाम्ना इव्व जावू लागसं बाईना घरंआता बाईच्या घरी लग्नाला जावे लागेल .
आख्खाना आख्खा जासू बाईनात्यासगळेच्या सगळे जाऊ या बाईंच्या घरी
बाईनां देवरनां.उदाहरण
उदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरण

संदर्भ