Jump to content

वाघनख

वाघनख

वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.

ऐतिहासिक संदर्भ

अफझलखानावर बिचव्याचा हल्ला चढवताना शिवाजीमहाराज

वाघनखांचा वापर १० नोव्हेंबर, इ.स. १६५९ रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान यास जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी केला होता, असे म्हणले जाते.

चित्रदालन

हे ही पहा