Jump to content

वाईन

दोन वेगळ्या प्रकारच्या वायनी (डावीकडून), पांढरी व तांबडी.

वाईन (मराठी लेखनभेद: वाइन ; अनेकवचन: वायनी ; इंग्लिश: Wine ; इटालियन, स्पॅनिश: Vino, विनो; फ्रेंच: Vin; जर्मन: Wein ;) हे द्राक्षांच्या रसापासून बनवण्यात येणारे एक मद्य आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा करून त्यात यीस्ट मिसळले जाते. द्राक्षांतील नैसर्गिक घटकांची यीस्टसोबत प्रक्रिया होऊन वाईन तयार होते.

पश्चिमात्य देशांमध्ये इ.स. पूर्व ६००० सालापासून वाईन बनवण्यात येत आहे. इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिकेची संयुक्त संस्थानेआर्जेन्टिना हे देश वाईन उत्पादनात अग्रेसर आहेत.

मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो.

हिंदी मध्ये हाला किंवा द्राक्षिरा म्हणतात. हे एक मादक पेय आहे. यात द्राक्षचे किण्वन बिना कोण्त्याही शर्करा, अम्ल, प्रकिण्व (एन्ज़ाइम), जल किंवा अन्य कोणत्याही पोषक तत्त्वाला टाकल्या विना होते. खमीर (यीस्ट) द्राक्ष रस मध्ये उपस्थित शर्कराला किण्वित करून इथेनॉल व कार्बन डाईऑक्साइड मध्ये परिवर्तित करतात. द्राक्ष आणि खमीरच्या वेगवेगळ्या जातीचा उपयोग करून वेगवेगळ्या स्वाद, गंध व रंगांची हाला बनते . हाला वर द्राक्ष लावण्यासाठीची जागा, वर्षा, सूर्य व द्राक्ष तोड़ण्याच्या वेळेसचा पण प्रभाव पडतो.

लाल, श्वेत आणि गुलाबी हाला अंगूर जांभळे ते हिरवे अनेक रंगांत येतात परंतु जवळ जवळ सर्व प्रकारच्या रसांचा रंग हिरवा-श्वेत असतो. लाल हाला (red wine, रेड वाइन) बनविण्यासाठी त्यात लाल द्राक्षांची साल सोडून देतात. ज्या मुळे त्याला रंग देणारे ऐन्थोसायनिन (anthocyanin) रसायन पण पाझरून हाला म्हणजे वाइनला रंग देतात. याच्या विरुद्ध श्वेत हाला (white wine, व्हाइट वाइन) साठी फक्त रसालाच किण्वित केले जाते. गुलाबी हाला (rosé wine, रोज़े वाइन) मध्ये लाल द्राक्षांची साली काही प्रमाणात टाकल्या जातात. अगदी थोडी एवढी नाही की वाइनचा रंग पूर्णच लाल होइल.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत