वांद्रेचा किल्ला
वांद्रेचा किल्ला | |
वांद्रेचा किल्ला | |
नाव | वांद्रेचा किल्ला |
उंची | १३ मी |
प्रकार | किनाऱ्यालगतचा किल्ला |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वांद्रे |
डोंगररांग | नाही |
सध्याची अवस्था | दुरावस्था |
स्थापना | १६४० |
कॅस्टिला डी अगुआडा (पोर्तुगीज: वाटरपॉईंटचा किल्ला),हा वांद्रेचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा मुंबईचा वांद्रे येथील एक किल्ला आहे. पोर्तुगीज "कॅस्टेलो" (किल्लेवजा वाडा) साठी "कॅस्टिला" ही चुकीची स्पेलिंग आहे. योग्यरित्या, याला कॅस्टेलो दा अगुआडा म्हणले पाहिजे, असे असले तरी पोर्तुगीज त्यास प्रत्यक्षात फोर्ट डी बँडोरा (किंवा वांद्रे किल्ला) म्हणतात. हे वांद्रे येथील लँड्स एंड येथे आहे. दक्षिणेकडील माहीम बेट, माहिमची खाडी व अरबी समुद्रावर लक्ष्य ठेवण्यासाठी १६४० मध्ये टेहळणी बुरूज म्हणून पोर्तुगीजांनी बांधला.[१] १६६१ मध्ये जेव्हा वांद्र्याच्या दक्षिणेकडील भाग जी मुंबईची सात बेटे इंग्रजांना आंदण दिल्यावर त्याचे सामरिक मूल्य वाढले. अगुआडा म्हणजे ती जागा जिथे ताजे पाणी झऱ्यांच्या स्वरूपात पोर्तुगीजांच्या जहाजांसाठी उपलब्ध असे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर उंचीपर्यंत अनेक पातळ्यांवर बांधण्ययात आला आहे.[१] दिल चाहता है व बुढ़ा मिल गया या हिंदी चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
इतिहास
१५३४ मध्ये गुजरातच्या बहादूर शहाला पराभूत करून पोर्तुगीजांनी या ठिकाणी एक तळ स्थापन केला होता. त्यांनी पश्चिम भारतीय किनारपट्टीवर अनेक समुद्र किल्ले बांधले. दक्षिणेस माहीम खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेला वरळी बेटे आणि दक्षिण पश्चिमेला माहीम शहर अश्या सामरिक ठिकाणी हा किल्ला बांधला. या किल्ल्याने मुंबई हार्बरकडे जाणाऱ्या उत्तरेकडील समुद्री मार्गाचे रक्षण केले. हा समुद्रमार्ग, एक मोठा मोहोर, नंतर एकोणिसाव्या शतकात समुद्रात भराव टाकून जमिनीशी जोडण्यात आला. पोर्तुगीज राजवटीत, संरक्षण म्हणून सात तोफांसह आणि इतर लहान बंदूकांनी सशस्त्र होते.[२] आजूबाजूच्या परिसरातील गोड्या पाण्याच्या झऱ्यातून जाणाऱ्या जहाजाला पिण्यायोग्य पाणीपुरवठा होत असे.[१]
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांचा नाश झाल्यानंतर, मराठे ब्रिटिशांच्या मालमत्तेसाठी सर्वात मोठा धोका बनले. पोर्तुगीजांच्या होणाऱ्या पराभवाचा इशारा घेऊन इंग्रजांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा किल्ला अर्धवट पाडला. जर मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला तर ब्रिटिश बॉम्बेवर हल्ला करण्यासाठी अग्रेसर सैन्य तळ म्हणून वापरल्याची शक्यता म्हणून हा किल्ला उद्ध्वस्त केला.
१७३९ मध्ये या बेटावर मराठ्यांनी आक्रमण केले; १७७४ पर्यंत पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी जेव्हा इंग्रजांनी हा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हापर्यंत त्यांच्यावर राज्य केले. १८३० मध्ये ब्रिटिशांनी लॅन्डस एंड (फोटोस्फीअर पहाण्यासाठी क्लिक करा) यासह साल्सेट बेटाचे मोठे भाग पारसी समाजसेवी बायरमजी जीजीभॉय यांना दिले. त्यानंतर जिजीबॉय यांनी डोंगरावर जेथे किल्ला आहे तेथे आपले निवासस्थान स्थापित केले आणि केपचे नाव बायरामजी जीजीभॉय पॉइंट असे ठेवले.[३]
संवर्धन
२००३ मध्ये वांद्रे बँड स्टँड रहिवासी ट्रस्टच्या वतीने किल्ला वाचविण्यासाठी संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याचे नेतृत्व स्थानिक संसद सदस्या (खासदार) शबाना आझमी यांनी केले, ज्यांनी खासदार निधीतून केलेल्या प्रयत्नांचा काही भाग दिला. कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या प्रवेशद्वारांपैकी एकाची विटांची कमान आणि भरती-ओहोटीमुळे धोक्यात आलेल्या किल्ल्याच्या भिंतींचे पायाभूत दगडी बांधकाम करून दुरुस्ती करण्यात आली. जवळच्याच ताज लँड्स एंडचे हॉटेल मालकावर मागील मालकाकडून वारसा मिळाल्यामुळे किल्ल्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.[१]
हा किल्ला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय)च्या मालकीचा आहे. किल्ल्याच्या नूतनीकरणामध्ये नैसर्गिक दगडांच्या संरचनेचे रक्षण करणे, पादचारी मार्ग बांधणे आणि वर्धकगृह तयार करणे समाविष्ट आहे. या नूतनीकरणाचे स्थापत्यकार पी के दास आहेत, ज्यांनी आधी कार्टर रोड परिसराचे डिझाइन केले होते.[३]
हे सुद्धा पहा
- माहीम किल्ला
- वरळी किल्ला
- महाराष्ट्रातील किल्ले
संदर्भ
- ^ a b c d Ball, Iain (19 March 2003). "Local 'army' offers to protect Mumbai's 'Castella'". Mumbai Newsline. Express Group. २४ जुलै २००६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ^ D'Cunha, Jose Gerson (1900). "IV The Portuguese Period". The Origins of Bombay (3 ed.). Bombay: Asian Educational Services. p. 212. ISBN 81-206-0815-1. 29 December 2008 रोजी पाहिले.
- ^ a b "Bandra to get back a chunk of its past glory". Times of India. Times Group. 4 August 2002. १६ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.
छायाचित्रे
- प्रवेशद्वार
- किल्ल्यावरील शिलालेख