Jump to content

वा.वि. भट

वामन वि. भट (१८ जून, इ.स. १९२० - १६ मे, इ.स. २०००) हेसोलापूर येथे २३-२४ जानेवारी १९८८ रोजी झालेल्या चौथ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

ते अभिनव प्रकाशन, मुंबई या संस्थेचे संस्थापक, प्रकाशक होते. अण्णा भाऊ साठे यांची 'फकिरा', बाबुराव बागुलांचे 'जेंव्हा मी जात चोरली!', व्यंकटेश माडगूळकरांची 'माणदेशी माणसं', नारायण सुर्वे, बा.सी. मर्ढेकर अशा अनेक मोठ्या लेखकांची पुस्तके वा.वि. भट यांनी प्रथम प्रकाशित केली. साहित्य चळवळीला वाहिलेल्या 'संग्रहालय' या त्रैमासिकाचे संपादक होते. 'आम्ही दोघं' हे चरित्र प्रकाशित झाले.