वस्तुभिमुख आज्ञावली
वस्तुभिमुख आज्ञावली हे ‘वस्तु’ ह्या संकल्पनेवर आधारित आज्ञावली प्रतिमान आहे. ‘वस्तु’मधे माहिती अणि आज्ञा हे दोन्ही असू शकतात. माहिती विशेषता (attributes ) किंवा गुणधर्मांच्या (properties ) स्वरूपात तर आज्ञा पद्धतिच्या (procedures किंवा methods) स्वरूपात असतात.
वस्तुंचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पद्धती वस्तूंशी संलग्न असतात आणि वस्तूंची महिती हाताळु आणि सुधारू शकतात. वस्तुभिमुक आज्ञावलींमधे सामान्यतः सद्य वस्तुचा संदर्भ देण्यासाठी this किंवा self सारखे विशेष नाव वापरले जाते. वस्तुभिमुक आज्ञावलींमधे, संगणक प्रोग्राम एकमेकांशी संवाद साधणाऱ्या वस्तूंपासून तयार केले जातात. वस्तुभिमुक भाषा वैविध्यपूर्ण आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय वर्ग-आधारित (class -based ) आहेत, याचा अर्थ वस्तु वर्गांचे उदाहरण आहेत.