वसंतगड
वसंतगड | |
वसंतगड | |
नाव | वसंतगड |
उंची | ९३० मीटर |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वसंतगड तळबीड |
डोंगररांग | बामणोली |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कऱ्हाड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. तसेच कराड-चिपळूण मार्गावर कराड पासून १३ किलोमीटर अंतरावरील वसंतगड हे एक गाव आहे . त्या गावातून म्हणजे कराड चिपळूण या राजमार्ग पासून उत्तर बाजूस ३ किलोमीटर अंतरावर किल्ले वसंतगड आहे . या गडावर जाण्यासाठी वसंतगड गावातून सुद्धा वाट आहे .
तसेच पुणे - बेंगलोर या महामार्गावरील तळबीड फाट्याला उतरून तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कराडवरून एस. टी. बसेसची सोय आहे. वसंतगड हा इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावाच्या होत्या.
कसे जाल?
- वसंतगडास भेट देण्यासाठी आधी कऱ्हाडला जावे लागते.. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तळबीड गावात दाखल झाल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच गडावर वाट जाते. गडावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
- दुसरा रस्ता सुपने या गावातूनही आहे.
- तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे. हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग असून एका खिंडीमार्गे कोकणात उतरतो.
इतिहास
◆ वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.
◆ इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला. मसूरचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता[१]. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले. महादजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला . याच महादजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला [२].
◆ पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.
◆ प्रवेशद्वार - गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे.
◆ गणेशाची मूर्ती आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
◆ चंद्रसेन महाराजांचे मंदिर - येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बाधणीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते.
◆ राजवाड्याचे अवशेष - मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात.
◆ जुन्या समाध्या - पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.
◆ बुरुज - गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
चंद्रसेन महाराज कुळदैवत
धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले.तरीहीत्या अवस्थेत तप पूर्ण करून भगवान महादेवाचे चंद्रसेन आवतार आहेत. लक्ष्मणाने व राम देवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. मंदिरात सध्या असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवले असून ते आजही पहायला मिळत असल्यामुळे या अख्यायिकेला दुजोरा मिळतो.अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात.चंद्रसेन देवांची मूर्ती हीं रामायण काळातील आहे . जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे, मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही. त्यांच्या उजव्या बाजूँस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.चद्रसेन देवांची उपासना वा वारी केल्यास सर्व दुःख,बाधा दूर होतें.असा अनेकांना अनुभव आहे.
भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोड, रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावली, विटा, खोडद अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत.मुळचे राष्ट्रकूट वंशज असणारे राणा राठोड याचें पुत्र कामराज यांनी घाटगे किताब मिळवत जागीर व मनसब वंशपरंपरागत मिळवली.याच कामराज राजेघाटगे यांच्या वंशज शाखा असानारे व चंद्रसेन देवाला कुळदैवत मानणारे निमसोड गावी राजेघाडगेंमंडळीनी चंद्रसेन देवांची 3मंदीरे उभारली आहेत.
छायाचित्रे
- गडावरील चंद्रसेन महाराजांचे मंदिर
- किल्ल्यावरील तलावकिल्ल्यावरील तलाव
- दरवाजाचे पडीक अवशेष
- जत्रेच्या वेळी माणसांनी गजबजलेला परिसर
- मुख्य दरवाजा
- किल्ल्याचे बुरूज
- बुरजाची रचना
संदर्भ
बाह्य दुवे
- २९ मे २००९चा लोकप्रभा साप्ताहिकाचा अंक. Archived 2009-05-26 at the Wayback Machine.
- साप्ताहिक लोकप्रभा मधील २४ नोव्हेंबर २००६ च्या अंकातली वसंतगडाची माहिती.[permanent dead link]
- फोर्ट ऑफ शिवराय या मराठी संकेतस्थळावरील वसंतगडाची माहिती. Archived 2011-03-16 at the Wayback Machine.
- मायबोली या संकेतस्थळावरील माहिती.
- महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या मराठी संकेतस्थळावरून साभार.[मृत दुवा]