Jump to content

वसंत शांताराम देसाई

वसंत शांताराम देसाई (जन्म :२७ डिसेंबर, इ.स. 1904; - २३जून १९९४) हे एक मराठी नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली.

वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.

विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.

वसंत शांताराम देसाई यांची साहित्य संपदा

  • अमृतसिद्धी (नाटक)
  • अशीच एकाची गोष्ट (आत्मचरित्र)
  • कलावंतांच्या सहवासात
  • कलेचे कटाक्ष
  • किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा)
  • कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी
  • खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा)
  • गडकऱ्यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा)
  • नट, नाटक आणि नाटककार
  • बालगंधर्व : व्यक्ती आणि कला
  • मखमलीचा पडदा
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
  • रागरंग
  • विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा)
  • विधिलिखित (नाटक)

सन्मान

  • वसंत शांताराम देसाई हे १९६० साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.