वसंत वाहोकार
वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
वाहोकरांनी लिहिलेली पुस्तके
- ओल्या हळदीचे ऊन (कथासंग्रह)
- खेळिया रे (कथासंग्रह)
- मनातील ऋतूंच्या नोंदी (मुक्त कविता)
- वंशवेल (कथासंह्रह)