Jump to content

वर्षा तोडमल

जन्म - १६ फेब्रुवारी

डॉ.वर्षा तोडमल या प्राध्यापिका, लेखिका, व्याख्यात्या, मुलाखतकार आहेत. म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली वीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठी साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करत आहेत. बालसाहित्य ,संत-साहित्य आणि शिक्षण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. कविता हा आस्थाविषय आहे.

शिक्षण

एम.ए.(मराठी, इंग्रजी) ,बी एड, डी.सी.जे, पीएच.डी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामध्ये पीएच.डी पदवीसाठी संशोधन केले. 'स्वामी विज्ञानानंद: व्यक्ती आणि वाङ्मय :एक चिकित्सक अभ्यास' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. प्राचार्य डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केले.

संशोधन कार्य

  • 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत संत तुकारामांचे साहित्यिक योगदान ' हा यु.जी.सी. अनुदान प्राप्त संशोधन प्रकल्प पूर्ण (२०१४)
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील १३ शोधनिबंध प्रकाशित.
  • साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये गीतारहस्य आणि लोकमान्य टिळकांचा सांस्कृतिक विचार यावर शोधनिबंधाचे सादरीकरण केले.
  • 'बीजिंग इट्स इम्पॅक्ट अंड इम्पलिकेशन ऑन इंडियन वुमन' या शोधनिबंधास (दिल्ली)  राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त.
  • पीएच.डी साठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत.
  • जळगाव आणि औरंगाबाद विद्यापीठात पीएच.डी साठी बहिस्थ परीक्षक म्हणून कार्यरत.

मन:शक्ती केंद्रातील कार्य

  • शालेय जीवनापासून मन:शक्ती प्रयोगकेंद्राशी संलग्न आहेत.
  • मनशक्तीच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मनशक्तीचा विचार समाजातील अनेक घटकांपर्यंत विनामूल्य पोहोचविला.
  • मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या बालकुमार आणि मनशक्ती या नियमित मासिकाच्या संपादक म्हणून कार्यरत

व्याख्याने

  • विविध विषयावर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक व्याख्याने दिली आहेत.
  • ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या तरुणींसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहेत.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'बहिःशाल व्याख्याता' म्हणून मान्यता.
  • जयकर व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थी,पालक,वंचित घटक, ज्येष्ठ नागरिकांसाठी दोनशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य

  • पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन मासिकांमध्ये तीन वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम. (१९९७ ते २०००)
  • डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये 'प्लेसमेंट ऑफिसर' आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत (२००१ ते २००३)
  • गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयात 'प्रभारी प्राचार्य' म्हणून कार्यरत (२००४ ते२००८)
  • २००९ पासून पुण्याच्या म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासनावरती सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.
  • सेंट मीराज कॉलेज पुणे, वाडिया कॉलेज, पुणे आणि आर.जे. कॉलेज, मुंबई या स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळावर सध्या कार्यरत आहे.
  • अभिजात आणि लोकवाङ्मय, कोशवाङ्मय कार्यशाळा आणि तीन शैक्षणिक परिषदांचे आयोजन.
  • राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून महाविद्यालयात कार्यरत
  • साहित्य संस्कृती महामंडळाच्या अक्षरयात्रा, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षरधारा, मनशक्ती, साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा मासिकातून सातत्याने लेखन.
  • साहित्य-संस्कृती महामंडळाने आयोजित केलेल्या समीक्षा आणि काव्य कार्यशाळांमध्ये सहभाग.
  • लोकमत, महाराष्ट्र टाइम्स ,तरुण भारत ,लोकसत्ता, या वृत्तपत्रातून लेखन आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन.
  • पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदन आणि भाषांतर, अनेक कार्यक्रमांचे संहिता लेखन संपादन, बांधणी
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादक मंडळावर पाच वर्ष सदस्य . (२०१६-२०२०)
  • महाराष्ट्रभर मुलाखती, सूत्रसंचालन, काव्यवाचन, काव्यकार्यशाळा आणि अभिवाचनाचे कार्यक्रम.

ग्रंथसंपदा

  • 'शिक्षणवेध' या महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक अधिवेशनाच्या स्मरणिकेचे संपादन, २००६
  • हिमानी काव्यसंग्रह, स्फूर्ति प्रकाशन, अहमदनगर १९९३
  • 'विज्ञान ज्ञान गभस्ती' चरित्रात्मक समीक्षा ग्रंथ, मन:शक्ती प्रकाशन, व्दितीय आवृत्ती २०१५
  • स्वामी विज्ञानानंद: शिक्षणातील प्रयोगशील विचारवंत (संपादन ) शैक्षणिक प्रयोगांवरील ग्रंथ २०१७
  • माणूस घडविणारे शिक्षण (संपादन) - २०१८
  • 'द पायोनियरिंग लाईट' (अनुवादित), मनशक्ती प्रकाशन, २०२१
  • उजळावया आलो वाटा, विश्वात्मक साहित्य संमेलन -स्मरणिका संपादन, संस्कृती प्रकाशन, २०२१
  • शिक्षणशोध - शोधनिबंध पुस्तिका, मनशक्ती प्रकाशन, २०२०

पुरस्कार

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी' पुरस्काराने सन्मानित २०१९
  • समरसता साहित्य संमेलन जळगाव काव्य  पुरस्कार, २०१४
  • कविवर्य विंदा करंदीकर काव्य लेखन पुरस्कार (२०००)
  • महाराष्ट साहित्य परिषदेतर्फे, जानकीबाई केळकर स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे 'सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंका'चे पारितोषिक प्राप्त, २०१८
  • अमरेंद्र गाडगीळ सर्वोत्कृष्ट मनशक्ती बाल कुमार दिवाळीअंक पुरस्कार.
  • साहित्यातील योगदानाबद्दल कॉसमॉस बँक आणि ग्रीन हेरिटेज पुरस्कार, २०२२
  • अखिल भारतीय प्रकाशक संघाचा पुरस्कार (बाल साहित्य )