Jump to content

वर्ल्ड व्हिजन

वर्ल्ड व्हिजनची स्थापना १९७७ साली अमेरिकेत वॉल्टर मुन्याहेम यांनी केली. ही एक शिक्षण, दान व प्रगती या द्वारे इव्हँजलिकल (धर्म परिवर्तन करणारी) संस्था आहे. ही सर्व धर्म परिवर्तन करणाऱ्या संस्थांची शिखर संस्थाही आहे. इ.स. २००८ मध्ये या संस्थेला सुमारे अडीच बिलियन डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या. ही संस्था आपल्या प्रमुख मार्गदर्शक तत्त्वांनुसार (स्टेटमेंट ऑफ फेथ नुसार) कार्य करण्यास कटिबद्ध आहे. वर्ल्ड व्हिजनच्या वेबसाईटनुसार ही प्रमुख ख्रिस्ती तत्त्वे पुढील प्रमाणे-

  • बायबल हे जगात एकमेव अधिकारक ग्रंथ आहे ज्यावर आमचा विश्वास आहे.
  • जगात फक्त एकच देव आहे तो पिता, मुलगा आणि आत्म्याच्या रूपात आहे.
  • आमचा विश्वास फक्त येशूवर, त्याच्या चमत्कारांवर, त्याच्या कुमारी मातेच्या पोटातून झालेल्या जन्मावर, त्याच्या आयुष्यावर, येशूच्या शक्तीमान होणे आणि कीर्तीवान पुनरुत्थानावर आहे.
  • मार्गापासून ढळलेल्यांना पाप्यांना मुक्ती देणे हे परम कर्तव्य आहे.
  • ख्रिश्चन झालेल्या लोकांत आत्म्याच्या असण्याने आपल्याला दैवी आयुष्य प्राप्त होते यावर आमचा विश्वास आहे.
  • मार्गावरून हरवलेले आणि सापडलेले या दोहोंचे पुनरुत्थान केले पाहिजे अन्यथा त्यांना नरकात जावे लागेल.
  • आमचा फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे ख्रिस्ती धर्मप्रसारकांची प्रमुख संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ एव्हेंजलिकल्स यांच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत.

नेतृत्व

वर्ल्ड विजनचे शिक्षण देतांना एक ख्रिस्ती धर्मप्रसारक संस्था या नात्याने धोरण म्हणून समाजातील नेतृत्व करू शकतील अशी लोकं शोधून त्यांना ख्रिस्ती नेतृत्व म्हणून पुढे आणण्यासाठी झटत असते. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, सेमिनार्स आणि इतर विविध मार्गांचा अवलंब केला जातो. वर्ल्ड विजनच्या विश्वासाप्रमाणे ख्रिस्ती मिशनरी कार्य हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे आणि त्यासाठीच ते झटतात. भारतात सध्या अनेक ख्रिस्ती नेते आहेत त्या मध्ये या कार्याचे यश असू शकते*. Minister of Information and Broadcasting, Ministry of Social Justice and Empowerment, Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs, Ministry of Rural Development. सध्याच्या काळात ही संस्था सुमारे दोन लाख सत्तावीस हजार एकशे आठ (227,108) मुलांना ख्रिस्ती तत्त्वांनुसार प्रशिक्षण देत आहे.

आरोप

जे मूल वर्ल्ड विजन जाहिरातीत दाखवतात त्या मुलाला तुम्ही देत असलेले पैसे दिले जातीलच असे नाही. कारण त्यामुळे समाजात असंतुष्टता माजते असे ते मानतात. त्या ऐवजी सर्व पैसे एकत्र केले जातात व त्यातले काही योग्य त्या कारणासाठी योग्य त्याठिकाणी वापरले जातात. मात्र त्यातले काही पैसे त्या मुलाच्या कल्याणासाठी खर्च होतील असे पाहिले जाते. जसे की थंडीच्या काळात तुम्ही स्पॉन्सर केलेल्या मुलांना मोफत जॅकेट देणे वगैरे. तसेच तुम्हाला त्या मुलांना कधीच भेटू देत नाही. मात्र हे त्या वेबसाईटवर डिक्लियर्ड आहे. वर्ल्ड विजन ही ख्रिस्ती मिशनरी कार्यासाठी जगभरातून सर्वात जास्त पैसा भारतात आणणारी संस्था आहे.

लक्षमणानंद यांची हत्या

वर्ल्ड व्हिजन हिंसक कार्यात गुंतल्याचे आरोप आहेत. जसे की स्वामी लक्षमणानंद यांची हत्या. स्वामी लक्षमणानंद यांनी, वर्ल्ड व्हिजन पैशाने ख्रिस्ती धर्मांतर करवते असा आरोप केला होता. हे थांबावे म्हणून ते प्रयत्नशील होते मात्र त्यातच त्यांचा खून झाला.

सांप्रदायिक दंगल

तसेच या संस्थेवर ओडिशा राज्यातील कंधमाळ येथे ख्रिस्ती-हिंदू वांशिक दंगल घडवल्याचाही आरोप केला जातो. २००४ मध्ये आलेल्या सुनामीच्या काळात पैसे आणि जीवनावश्यक वस्तुंसाठी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप केला जातो. तसेच या काळात आलेल्या मोठ्या देमोठ्याया संस्थेने गुलदस्त्यात ठेवल्या असा अजून एक आरोप दिसून येतो.

प्रकल्प

मात्र हे आरोप असले तरी शिक्षणाच्या कार्यात या संस्थेचे योगदान दुर्लक्ष्य करण्यासारखे नाही. भारतात सुमारे ४० मोठे प्रकल्प संस्था चालवत आहे. हे सर्व ख्रिस्ती धर्मांतर प्रकल्प भारतातून दान झालेल्या पैशानेच चालवले जात आहेत. सध्याच्या काळात ही संस्था भारतात सुमारे दोन लाख सत्तावीस हजार एकशे आठ (227,108) मुलांना तत्त्वांनुसार प्रशिक्षण देत आहे. अर्थातच हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात सध्या द विदर्भ लाईव्हलीहुड प्रमोशन प्रकल्प सुरू आहे. यानुसार अतिगरीब शेतकरी शोधून त्यांना योग्य ती मदत संस्थेच्या धर्मांतर तत्त्वांनुसार दिली जाते आहे.