वर्णे
?वर्णे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कर्जत |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
वर्णे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
बोरघाट रायगड जिल्ह्यात जिथे उतरतो तिथे कर्जतजवळ; पळसदरी हे ठिकाण असून या पळसदरी लोहमार्ग स्थानकापासून २.९ किमी अंतरावर वर्णे हे कर्जत- खोपोली मार्गावरील गाव आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
वर्णे बौद्ध लेणी :- वर्णे हे कर्जत- खोपोली मार्गावरील गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या टेकडीवजा डोंगराच्या मध्यावर (अक्षांश 17.290332, रेखाांश 76.289063) एक अपरिचित बौद्ध लेणी आहे. या लेण्यांच्या वरून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो. त्यामुळे लेण्यांची झीज व पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या लेण्यांच्या पायथ्याला एक वैशिष्टयपूर्ण पाण्याचे टाके असून त्याची रचना वर्तुळाकार आहे. प्राचीन बोरघाट मार्गावरील खोपोलीजवळील हाळ खुर्द येथेसुद्धा विहार स्वरूपातील बौद्ध लेणी असून त्यामध्ये सहा भिक्खूनिवास असलेले दिसून येतात.
सहा तोंडी पाण्याचे टाके:- लेण्यांच्या पायथ्याला एक वैशिष्ट्येपूर्ण पाण्याचे टाके (अक्षांश 20.541507, रेखांश 78.134766) आहे. टाक्यांची रचना इतर टाक्यांप्रमाणे चौकोनी नसून वर्तुळाकार स्वरूपाची दिसून येते. उन्हामुळे पाण्याची वाफ होऊ नये म्हणून ते भूमिगत असे खोदलेले असून त्याचा वरील भाग मूळ दगडानेच आच्छादित आहे. हे मूळ दगडी आच्छादन कोणत्याही खांबांविना असून अधांतरी आहे. पाणी काढण्यासाठी सहा ठिकाणी लहानमोठे चौकोनी आकाराची जागा केली असून स्थानिक लोक त्यास सहा तोंडी पाण्याचे टाके म्हणतात. अंदाजे ५ मीटर व्यासाचे हे टाके ७ फूट खोल आहे. येथील प्राचीन घाटवाटांच्या साहाय्याने प्रवास करणारे व्यापारी तांडे, वाटसरू, पांथस्थ, भिक्खू यांची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे पाण्याचे टाके व विश्रांतीसाठी लेणीचा उपयोग होत असणार हे नक्की.