Jump to content

वरुण धवन

वरुण धवन
जन्मवरुण डेव्हिड धवन
२४ एप्रिल, १९८७ (1987-04-24) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१२ – आजतागायत
प्रमुख चित्रपटमैं तेरा हीरो
स्टुडन्ट ऑफ द इयर
वडीलडेव्हिड धवन
आई करुणा धवन
पत्नी
नताशा दलाल (ल. २०२१)
धर्महिंदू
स्वाक्षरी

वरुण धवन ( २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[]

प्रारंभीचे आयुष्य

वरुणचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि करुणा धवन यांच्याशी झाला. त्याचे कुटुंब पंजाबी आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित हा चित्रपट दिग्दर्शक असून तो देसी बॉईझ या चित्रपटासाठी ओळखला जातो, तर काका अनिल हा अभिनेता आहे.[] त्याने वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील एच.आर. शिक्षण पूर्ण केले. वरुणने युनायटेड किंगडमच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.[] अभिनय कारकिर्दीपूर्वी धवनने करण जोहरच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात माय नेम इज खान (२०१०) या चित्रपटात काम केले.[]

वैयक्तिक माहिती

२४ जानेवारी २०२१ रोजी वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले जिच्या बरोबर तो शाळेत शिकला होता आणि १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होता.[][]

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयररोहन नंदा
२०१४ मैं तेरा हीरोरीनाथ "सिनु" प्रसाद
२०१४ हम्प्टी शर्मा की दुल्हनियाराकेश "हम्प्टी" शर्मा
२०१५ बदलापूरराघव "रघु" प्रताप सिंग
२०१५ एबीसीडी २ सुरेश "सुरू" मुकुंद
२०१५ दिलवालेवीर रणधीर बक्षी
२०१६ दिशूमजुनैद "जे" अन्सारी
२०१७ बद्रिनाथ की दुल्हनियाबद्रीनाथ "बद्री" बन्सल
जुडवा २प्रेम / राजा
२०१८ ऑक्टोबरदानिश वालिया
सुई धागामौजी शर्मा
२०१९ कलंकजफर चौधरी
२०२० स्ट्रीट डान्सर ३डीगब्बरु
कूली नंबर १राजू कूली / कुंवर राज प्रताप सिंह

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "The verdict is out: Varun Dhawan is officially a SUPERSTAR! : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2017-10-05. 2021-05-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Happy Birthday Varun Dhawan: 7 lesser known facts about the star!" (इंग्रजी भाषेत). 2016-04-24. 2021-05-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Check out: Varun Dhawan during his college days : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2013-01-18. 2021-05-15 रोजी पाहिले.
  4. ^ "The new stars of Bollywood - Hindustan Times". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2012-10-05. 2012-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-15 रोजी पाहिले.
  5. ^ "२४ जानेवारीला होणार वरुण- नताशाचं लग्न, कर्मचाऱ्यांना दिल्या खास सूचना". महाराष्ट्र टाइम्स. 2021-05-15 रोजी पाहिले.
  6. ^ "Varun Natasha Wedding: शाही लग्न सोहळ्यातील PHOTO VIRAL". न्यूझ १८ लोकमत. 2021-05-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वरुण धवन चे पान (इंग्लिश मजकूर)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत