वरधारा
वरधारा (अन्य नावे: वृद्धदारु ; शास्त्रीय नाव: Argyreia nervosa / Argyrea nervosa var. speciosa ; इंग्लिश: Woolly Morning Glory (वूली मॉर्निंग ग्लोरी), Elephant Creeper (एलिफंट क्रीपर) ;) ही बारमाही उगवणारी, उंचावर चढणारी वेल आहे. ही मूलतः भारतीय उपखंडातील असून आधुनिक काळात हवाई बेटे, आफ्रिका, कॅरिबियन बेटे व जगभरात अन्यत्र पसरली आहे. हिच्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातील काही औषधोपचारांत वरधारा वापरली जाते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अमेरिकन शासनाच्या वनस्पतीविषयक विदागारातील माहिती (इंग्लिश मजकूर)