Jump to content

वडगाव लांबे

वडगाव लांबे हे चाळीसगाव तालुक्यातील आदर्श गाव आहे. गीर्णाई ने पावन झालेले 90% शिवार बागायती आहे. वटेश्वर महादेवाच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार झालेला रवी महाराजांचा आश्रम व गो-शाळा निसर्गरम्य आहे. गावातील लोक खूप धार्मिक आहेत. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. आठवडे बाजारही भरतो. गावात राजपूत, कोळी, मराठा, चांभार, बौद्ध, भिल्ल अश्या अनेक समाजाची लोक गुण्या गोविंदाने रहातात. बागायती शिवारामुळे उद्योग भरपूर आहेत. लोकसंख्या साधारण पाच हजारच्या आसपास आहे.