Jump to content

वडगाव रासाई

  ?वडगांव रासाई

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरशिरूर
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

वडगांव रासाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.

प्रेक्षणीय स्थळे

गावात रासई देवीचे प्रसिद्ध जागृत असे भव्य देवस्थान आहे. निसर्गरम्य नदी काठ.गावापासून २० किलोमीटर अंतरावर ईशान्य दिशेस हडप्पा संस्कृती मधील ३४०० ते २७०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले गाव भीमा नदीची उपनदी घोडनदी काठी सापडले आहे या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाची आर्किओलॉजिकल साईट आहे. याठिकाणी घरामध्ये मानवी अवशेष पुरलेल्या अवस्थेत आढळले आहेत.

नागरी सुविधा

मांडवगण फराटा, सदलगाव, कुरुळी, नागरगाव, हातवळन,इ. शेजारील गावे. गावातुन भीमा नदी वाहत असल्याने येथील शेतकऱ्यांचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, वडगाव रासाई गावतुन रोज सकाळी ०७ :०० वाजता तांदली - पुणे ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अविरत सुरू असल्या कारणाने गाव जिल्याला जोडले गेले आहे. गावा जवळून १५ किलोमीटर अंतरावरून पुणे - सोलापूर महामार्ग गेला असल्या कारणाने गावाला ते देखील इतर जिल्ह्याशी बेटर कनेक्टिव्हिटीचा एक पर्याय आहे. गावात श्री.किरण शिवाजी ढवळे यांच्या मालकीचे रासई देवी कृषी सेवा केंद्र असून ते पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी बी - बियाणे, खते, औषधे शेतकऱ्यांना माफक दरात पुरवठा करीत असतात.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate