वज्रयान (मंगोलियन: Очирт хөлгөн, Ochirt Hölgön, चिनी: 密宗, mì zōng) हा बौद्ध धर्माचा एक संप्रदाय आहे. वज्रयान ही बौद्धमताची अनेक शतकांदरम्यान उत्क्रांत झालेली व्यामिश्र आणि बहुमुखी व्यवस्था आहे. ही तांत्रिक बौद्धमत, तंत्रयान, मंत्रयान, गुप्त मंत्र, गोपनीय बौद्धमत आणि हिरा मार्ग या नावांनीही ओळखली जाते. मंगोलिया आणि भूतान या देशांत वज्रयान बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. तसेच भूतानचा वज्रयान हा राजधर्म आहे.
वज्रयान धर्मसाहित्यानुसार बोधीच्या तीन मार्गांपैकी वज्रयान हा एक आहे. थेरवाद व महायान हे इतर दोन मार्ग होत. वज्रयानाची स्थापना भारतीय महासिद्धांनी केली असून वज्रयानात बौद्ध तांत्रिक साहित्य प्रमाण मानले जाते.
विस्तार
कालमिकिया, तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांतील बहुसंख्यक जनता ही वज्रयान बौद्ध धर्म अनुसरणारी आहे.