वज्रपाणी
एक बोधिसत्व | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | god, बोधिसत्व | ||
---|---|---|---|
| |||
वज्रपाणी एक बोधिसत्व आहेत. ध्यानी बुद्ध अक्षोभ्य आणि मामकी देवी यांचा आध्यात्मिक पुत्र. वज्र हे याचे प्रतीक असून, नीलकमल हे अभिज्ञानचिन्ह आहे.
हा नीलवर्ण आहे. याच्या प्रतिमा उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असून, त्याच्या हाती वज्रसहित कमल असते. केव्हा केव्हा तो एका हातात छातीजवळ वज्र धरतो.
सुजाता ही याची शक्ती असून, ॐ वज्रपाणि हुम् हा याचा मंत्र आहे. जेव्हा बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी नाग आले, तेव्हा बुद्धाने वज्रपाणीला गरुडापासून त्यांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली, अशी कथा आहे. याने असुरांशी युद्ध करण्यासाठी अनेक उग्र रूपे धारण केली होती.
वज्रपाणिलोकेश्वर या नावाने याचे आणखी एक वेगळे रूप आढळते, ते असे- हा एकमुख व द्विभुज असून, कमळावर उभा असतो. तो आपल्या उजव्या हातात वज्र घेऊन ते मस्तकावर धरतो व डावा हात बेंबीजवळ धरतो. तो अर्धपर्यंक नृत्यावस्थेत आहे.
या बोधिसत्वाच्या बऱ्याच मूर्ती तिबेट व चीन या देशांत आढळल्या आहेत. [१][२]
कलादालन
- मोगाओ लेणींच्या लपलेल्या लायब्ररीतील, दुनहुंग, चीनमधील वज्रपाणी. शक्ती आणि संतापाचे व्यक्तिमत्त्व. ९व्या शतकाच्या उत्तरार्धात, तांग वंश.
- बौद्ध भिक्षूंच्या गटासह वज्रापाणी. गंधार
- नेपाळमधील बोधिसत्व वज्रपाणीची पितळेची मुर्ती, १७३१.
संदर्भ
- ^ जोशी १९७४.
- ^ https://archive.org/details/northernbuddhism00gettuoft, The Gods of Northern Buddhism.
संदर्भसूची
जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. ४६१. वज्रपाणी