वज्रगड किल्ला
वज्रगड | |
नाव | वज्रगड |
उंची | १५००मी |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | पुणे जिल्हा , महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सासवड [पुणे] ता.पुरदंर जि.पुणे |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | बरी |
स्थापना | {{{स्थापना}}} |
वज्रगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
पुणे
इतिहास
१२ एप्रिल १६६५ “किल्ले वज्रगड”....🚩
पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला गड फत्ते झाला..ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला...
इकडे तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते अग्नीवर्षाव करीतचं होते पुरंदर शर्थीने लढतच होता पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ति तारीख होती १२ एप्रिल १६६५....
पडलेल्या बुरुजामुळे दिलेरखानाला विजयोन्माद चढला आणि त्याने पठाणांना वज्रगड वर चढून जाण्याची आज्ञा केली. पण मराठे देखील चिवट त्ये थोडी लगेच हार माणनारं हातघाईची लढाई जुंपली ३०० मावळ्यांनी किल्ला भांडता ठेवला सायंकाळ झाली मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले त्यामुळे बुरुज सोडून ते आतील कोटात गेले बुधवार मावळला. मराठ्यांचा कोटाच्या आतून चिवट प्रतिकार तरीही सुरूच यात मराठ्यांनी दिलेरचे ८० सैनिक मारले व ११० सैनिक जखमी झाले अखेर आवसान संपले तेव्हा मराठ्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि मिर्झा राजांनीही त्यांना अभयाचा कौल दिला...
शेवट शुक्रवार १४ एप्रिल १६६५ वज्रगड मराठ्यांनी मोगलांच्या हवाली केला.....
➖➖➖➖➖➖➖
(हि माहिती थोडक्यात आहे)
माहिती संपादन -यश जगताप
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर एक प्रवेशद्वार व हनुमान मंदिर ,महादेवाचे मंदिर इत्यादी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत..
गडावरील राहायची सोय
गडावर राहण्यासाठी कोणतीही सोय नाही..
गडावरील खाण्याची सोय
गडावर कोणतीही खाण्याची सोय नाहीये..
गडावरील पाण्याची सोय
पिण्याच्या पाण्याची गडावर सोय नाही
गडावर पाण्याचे टाके आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी जुनी वाट ही पुरंदर किल्ल्यावरून होती पण आता भारत सरकार अंतगर्त सैनिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेथील जूनी वाट बंद केली आहे...
मार्ग
पुणे - दिवे घाट/बोपदेव घाट - सासवड - नारायणपूर रोड जवळ
जाण्यासाठी लागणारा वेळ
साधारण २ तास
संदर्भ
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले