Jump to content

वंशस्थ (वृत्त)

वंशस्थ हे संस्कृत काव्यात वापरले जाणारे एक समवृत्त आहे. वंशस्थ वृत्तात लिहिलेल्या काव्यातल्या प्रत्येक ओळीत १२ अक्षरे असून त्यांचे ज त ज र असे गण पडतात. पंडितराज जगन्‍नाथ या संस्कृत कवीने आपले ६० श्लोकांचे करुणालहरी हे काव्य अंशतः वंशस्थ वृतात आणि अंशतः वियोगिनी वृत्तात लिहिले आहे.