Jump to content

वंदना विटणकर

वंदना विटणकर
मृत्यूडिसेंबर ३१, इ.स. २०११
नेरूळ,नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वमराठी, भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, गीतलेखन (चित्रपट)
भाषामराठी
साहित्य प्रकार कविता, गीते, बालनाट्ये
पती चंद्रकांत विटणकर (इ.स. १९८६पर्यंत [])
किशोर पनवेलकर (इ.स. १९८६[] - इ.स. २०११)

वंदना विटणकर (जन्मदिनांक अज्ञात - ३१ डिसेंबर, इ.स. २०११; नेरूळ,नवी मुंबई महाराष्ट्र) या मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार होत्या. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या.

कारकीर्द

त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.

वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत.

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
आई पाहिजेइ.स. १९८८मराठीगीतलेखन
आज झाले मुक्त मीइ.स. १९८६मराठीगीतलेखन
आम्ही दोघं राजा राणीइ.स. १९८६मराठीगीतलेखन
अर्धागीमराठीगीतलेखन
मर्दानीइ.स. १९८३मराठीगीतलेखन

लोकप्रिय गीते

  1. खेळ कुणाला दैवाचा कळला
  2. नाते जुळले मनाशी
  3. मी प्रेम नगरचा राजा
  4. परिकथेतील राजकुमारा
  5. राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
  6. आज तुजसाठी या पावलांना
  7. अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
  8. हा रुसवा सोड सखे
  9. हे मना आज कोणी
  10. अगं पोरी संबाल दर्याला
  11. तुझे सर्वरंगी रूप
  12. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
  13. खेळ तुझा न्यारा
  14. Antarangi Rangalele Geet Jhaale

व्यक्तिगत जीवन

वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता.. चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर इ.स. १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला[].

निधन

आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वंदना विटणकर नेरूळ येथील आनंदश्रमात पती किशोर पनवेलकर यांच्यासह वास्तव्यास होत्या. ३१ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ०७३० वाजण्याच्या सुमारास चहा घेताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने, नजीकच्या रुग्णालयात प्रथम नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने त्यांना डॉ. डी.वाय. हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरले. तेथे नेत असतानाच भारतीय प्रमाणवेळेनुसार १००० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले []. मृत्युसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या.

मृत्यूपश्चात नेत्रदान व देहदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्‍त केली होती. त्यानुसार डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले; तर कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात देहदान करण्यात आले.

वंदना विटणकर यांचे कविता संग्रह/गीत संग्रह

  • एप्रिल फूल
  • बजरबट्टू
  • भं भं भोला
  • हे गीत चांदण्यांचे

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c "ज्येष्ठ कवयित्री, गीतकार वंदना विटणकर यांचे निधन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "ज्येष्ठ कवयित्री वंदना विटणकर यांचे निधन". 2012-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे