व.ब. अरगडे
वसंतराव बलवंत अरगडे (जन्म : पंढरपूर, १८ सप्टेंबर, इ.स. १९१६) हे पुणे जिल्हा परिषदेचे एक मराठी उपशिक्षणाधिकारी होते. १९७४ साली नोकरीवरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शाइक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिण्याचा उपक्रम चालू ठेवला.
व.ब. अरगडे यांनी लिहिलेली पुस्तके
- उद्याची शाळा
- करुणाष्टके (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
- कोण गरीब आहे?
- तरंग (लघुनिबंधसंग्रह)
- दासबोध (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
- दिवळ्याची दिवाळी
- श्रीनृसिंहकोश (तीन खंड, लेखन आणि प्रकाशन)
- पांडुरंग पावला
- भूमाता की जय
- मनाचे श्लोक (इंग्रजी अनुवाद, मूळ मराठी कवी - रामदास)
- मराठी व्याकरण
- शैक्षणिक मूल्यमापनाची रूपरेषा
- श्रीक्षेत्रराज नीरा-नरसिंहपूर.
सन्मान
- वसंतराव अरगडे यांचा त्यांच्या वयाच्या १००व्या वर्षी पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्ने ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सन्मान केला.