Jump to content

लोसूंग महोत्सव

लोसूंग
लोसूंग
उत्तर सिक्कीममधील लाचुंग मठात नवीन वर्षाचा उत्सव
आधिकारिक नावलोसूंग
इतर नावेसोनम लोसूंग, नामसूंग
अनुयायीभुतिया, लेपचा
उद्देशसिक्कीमी नवीन वर्ष
लेपचा नवीन वर्ष

 

लोसूंग हे सिक्कीमचे नवीन वर्ष आहे.[] भूतिया जमाती द्वारे हे दरवर्षी डिसेंबरमध्ये साजरे केले जाते.

परंपरा

तिबेटी चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे.

  • लोसूंग १० व्या महिन्याच्या १८ व्या दिवशी येतो, जेव्हा शेतकरी कापणीचा उत्सव साजरा करतात.[]
  • हा भुतियांचा पारंपारिक सण आहे, पण लेपचा लोकही तो साजरा करतात आणि त्याला नामसूंग म्हणतात.[]
  • तिबेटी नववर्ष, लोसारच्या परंपरा आणि विधींमधून हा सण स्वीकारला गेला आहे.
  • हा उत्सव सिक्कीममधील फोडोंग आणि रुमटेक मठात आयोजित केला जातो.[]
  • तिस्ता आणि रोंगयुंग चू नदीच्या संगमावर अप्पर झोंगू प्रदेशात दरवर्षी नामसूंग उत्सव साजरा केला जातो.[१]

लोसूंग केवळ भारतातच नाही तर नेपाळ आणि भूतानमध्येही साजरा केला जातो.

उत्सवात सादर होणाऱ्या नृत्य प्रकारांमध्ये पद्मसंभव (किंवा गुरू उग्यान) यांच्या जीवनातील कथाकथांचे वर्णन केले जाते.[]

उत्सव

पुजारी देवतांना 'ची-फुट', विशेष मद्य अर्पण केल्यानंतर उत्सव सुरू होतो. देवांना अर्पण केल्यानंतर राक्षस राजाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. राक्षसाला जाळणे याला वाईटाचा नाश करण्याचे प्रतिक मानले जाते.

काही स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि आनंदोत्सव अनेक दिवस टिकतो. या उत्सवाला सोनम लोसूंग असेही म्हणतात. लोसूंग हा सण पूर्व भारतात खूप प्रसिद्ध आहे.

संदर्भ

  1. ^ Tshering, Ugen. "Losoong (Sikkimese New Year) - Windhorse Tours". Windhorse Tours. 2017-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ "State Portal, Government of Sikkim, India - Festivals In Sikkim". www.sikkim.gov.in. 2017-08-11 रोजी पाहिले.
  3. ^ FTD.Travel. "Lepcha(Losoong), Bhutia(Namsoong), Sonam Lhochar - Sikkim New Year". www.ftd.travel. 2017-08-11 रोजी पाहिले.
  4. ^ Ray, Arundhati (2001). Sikkim: A Traveller's Guide. Orient Blackswan. ISBN 9788178240084.
  5. ^ "Lasoong festival is celebrated in which of the following states? - General Knowledge Today". www.gktoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.