लोणार सरोवर
लोणारचे सरोवर स | |
---|---|
स्थान | बुलढाणा, महाराष्ट्र, भारत |
गुणक: 19°58′36″N 76°30′30″E / 19.97667°N 76.50833°E | |
भोवतालचे देश | भारत |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | १.१३ चौ.किमी |
सरासरी खोली | १३७ मी |
भोवतालची शहरे | लोणार |
लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे.[१] याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली.[२] हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर (विवर) आहे आणि या विवरचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे सरोवरात (विवरात) आहेत. तर काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत.
सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.[३] पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.[४][५]
अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, खरगपूर (इंडिया) यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. आता महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामसर पाणथळ स्थळ ठरले आहे.
विवर निर्मिती
पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रमाणेच भूगर्भीय प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते. पण एक अतिवेगवान धूमकेतू किंवा उल्का तिथे आदळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. तिथे प्लँगिओक्लेज नावाचे खनिज सापडले आहे. हे खनिज एकतर मास्केलिनाइट मध्ये रूपांतरित झाले आहे किंवा त्याच्यामध्ये प्लेनर डिफॉर्मेशन[मराठी शब्द सुचवा] वैशिष्ट्ये आहेत. असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून ३५ ते ४० अंशांच्या कोनाने आली आणि आदळली.[६]
सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नावीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.[४][६]
विवर इतिहास
पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार हे नाव मिळाले. ब्रिटिश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.
एकाच विहरीतील पाण्याची चव गोड व खारी
सासु-सूनेच्या या विहिरीतील देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे, म्हणजेच ते सुनेचे पाणी होय. तर विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे म्हणजेच ते सासूचे पाणी होय. त्यामुळे तिला सासु-सूनेच्या विहिर असे संबोधले जाते. भारतातील परंपरेत जलतीर्थ, स्थालतीर्थ, कामतीर्थ, मोक्षतीर्थ असे तीर्थचे विविध प्रकार सांगितले आहे. जलतीर्थमुळे शारीरिक शुद्धी होते, खरूज नाहीशी होते व मन प्रसन्न होते, अशी धारणा मानली आहे. जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू-सुनेचे विहिरीचे पौराणिक महत्त्व सांगितल्या जाते. त्यामुळे ही विहीर पार्यटाकांसाठी आकर्षण केंद्र बिंदू आहे.
सरोवर परिसर
लोणार सरोवराजवळ ७०० मि. अंतरावर छोटीशी खळगी पडलेली आहे, जेथे हनुमान मंदिर आहे.
विवरला धोका
लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे तेथे सध्या अनेक धोके निर्माण झाले आहेत.
- आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी अणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तिथली दुर्मीळ जैवविविधता धोक्यात आली आहे.[७]
- अलीकडे लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेही सरोवराला धोका निर्माण झाला आहे.[८]
चित्रदालन
- उपग्रह छायाचित्र
महाराष्ट्राचे लोणार सरोवर हे एक आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले आहे.[९] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील ही सात आश्चर्य निवडली गेली आहेत.
जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट् या कार्यक्रमाद्वारे सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशिगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांमधून सात वंडर्सची निवड करण्यात आली.
हे सुद्धा पहा
- लोणार सरोवराचे 10 आश्चर्यकारक तथ्य[permanent dead link]
- लोणार अभयारण्य
- लोणार (गांव)
संदर्भ
- ^ "Geology [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजपत्र. 2008-09-08 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "Lonar". The Planetary and Space Science Center. 2008-09-08 रोजी पाहिले.
- ^ साचा:Cite Earth Impact DB
- ^ a b F. Jourdan; F. Moynier; C. Koeberl; S. Eroglu. (July 2011). "40Ar/39Ar age of the Lonar crater and consequence for the geochronology of planetary impacts". Geology. 39 (7): 671–674. doi:10.1130/g31888.1.
- ^ Jourdan, F.; et al. (2010). "First 40Ar/39Ar Age of the Lonar Crater: A ~0.65 Ma Impact Event?" (PDF). 41st Lunar and Planetary Science Conference Proceedings. Lunar and Planetary Institute: 1661.
- ^ a b "लोणार सरोवर".
- ^ किशोर मापारी. "लोणार सरोवराला दूषित पाण्याचा धोका!".
- ^ "लोणारच्या जलपातळीत वाढ".
- ^ "महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा". 2018-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-30 रोजी पाहिले.