लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
बॉस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ Boston Logan International Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: BOS – आप्रविको: KBOS – एफएए स्थळसंकेत: BOS – WMO: 72509 | |||
नकाशाs | |||
विमानतळाचे रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | मॅसेच्युसेट्स पोर्ट ऑथोरिटी (मासपोर्ट) | ||
कोण्या शहरास सेवा | बॉस्टन | ||
स्थळ | ईस्ट बॉस्टन | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | २० फू / ६ मी | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
4L/22R | ७,८६१ | २,३९६ | डांबरी |
4R/22L | १०,००५ | ३,०५० | डांबरी |
9/27 | ७,००० | २,१३४ | डांबरी |
14/32 | ५,००० | १,५२४ | डांबरी |
15L/33R | २,५५७ | ७७९ | डांबरी |
15R/33L | १०,०८३ | ३,०७३ | डांबरी |
सांख्यिकी (२०१२) | |||
विमान आवागमन | ३,५४,८६९ | ||
प्रवासी | २,९३,२५,६१७ | ||
स्रोत: एफ.ए.ए.,[१] Massport.[२] |
जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[३] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[४] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[५]
हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.
सांख्यिकी
सर्वाधिक प्रवासी नेणाऱ्या विमानकंपन्या
क्र | विमानकंपनी | प्रवासी | हिस्सा |
---|---|---|---|
१ | जेटब्लू एरवेझ | ३०,७२,००० | ३२.९३% |
२ | अमेरिकन एरलाइन्स | १८,३८,००० | १९.७०% |
३ | डेल्टा एर लाइन्स | १४,२२,००० | १५.२४% |
४ | युनायटेड एरलाइन्स | ८,५४,००० | ९.१६% |
५ | साउथवेस्ट एरलाइन्स | ६,३७,००० | ६.८३% |
- | इतर* | १५,०७,००० | १६.१५% |
* - यात अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेसचा समावेश आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ . Retrieved February 3, 2012.
- ^ "विमानतळ सांख्यिकी". 2011. 2010-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 3, 2012 रोजी पाहिले.
- ^ http://www.bts.gov/publications/pocket_guide_to_transportation/2008/html/table_04_07b.html
- ^ "MASSPORT: Logan Airport: FAQ". 2008-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-09-26 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2008-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-22 रोजी पाहिले.
- ^ "Boston, MA: Logan International Airport (BOS)". Bureau of Transportation Statistics. June 20, 2021 रोजी पाहिले.