Jump to content

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (चिपळूण)

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर महाराष्ट्राच्या चिपळूण शहरातील ग्रंथालय व पुस्तक संग्रहालय आहे.

स्थापना

१ ऑगस्ट १८६४ या दिवशी चिपळूण शहरात याची स्थापना झाली. ग्रंथप्रेमी वकील बाळाजी सखाराम काशीराम यांनी स्वतःजवळील ग्रंथसंग्रह घेऊन इतर नागरिकांच्या मदतीने नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने स्थापना केली. अनेक दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा हा ग्रंथसंग्रह दिवसेंदिवस वाढत गेला. १९४० साली न.चिं. केळकरांच्या हस्ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण असे नामकरण झाले.[]

वैशिष्टे

ग्रंथालयात ३०० वर्षांपूर्वीची अनेक हस्तलिखिते आहेत. ग्रंथसंख्या ६२३४४ असून दुर्मिळ ग्रंथ १४२७ आहेत. १८९२ चेविविध ज्ञान विस्तारचे अंक आहेत. तसेच ३०० पुस्तकांवर संबंधित लेखकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "संशोधन केंद्र आणि इमारतीसाठी चिपळूणच्या ग्रंथालयाला हवा मदतीचा हात". Loksatta. 2019-12-05 रोजी पाहिले.