लोकमान्य: एक युगपुरुष
लोकमान्य:एक युगपुरुष | |
---|---|
दिग्दर्शन | ओम राऊत |
निर्मिती | एस्सेल व्हिजन प्रोडक्शन |
प्रमुख कलाकार | सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, प्रिया बापट |
संगीत | अजित परब-समीर सप्तीसकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २ जानेवारी २०१५ |
अवधी | १३९ मिनिटे |
लोकमान्य: एक युगपुरुष हा ओम राऊत दिग्दर्शित आणि नीना राऊत एंटरटेनमेंट निर्मित २०१५ चा भारतीय चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट बाळ गंगाधर टिळक - एक समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक यांच्या जीवनकथेवर आधारित आहे. या चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुबोध भावे यांनी भारतीय राष्ट्रवादी आणि समाजसुधारक बाळ गंगाधर टिळक यांची मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट ओम राऊतचा दिग्दर्शनात पदार्पण आहे आणि नीना राऊत निर्मित आहेत. पटकथा ओम राऊत आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली असून अजित-समीर या जोडीने संगीत दिले आहे. हा चित्रपट २ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
कलाकार
- सुबोध भावे
- चिन्मय मांडलेकर
- प्रिया बापट
- अंगद म्हसकर
- समीर विद्वांस