Jump to content

लोकगीत

लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ऱ्हस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[](ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref)

लोकसंगीताचे प्रकार

लावणी, भारुड, गोंधळादरम्यान गायली जाणारी गाणी, भोंडल्याची गाणी, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भलरी गीते, आदिवासी गीते, पोवाडे, लावण्या, मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, दिवाळीची गाणी, लग्नाची गाणी, कोजागिरीची गाणी, पावसाची गाणी, गवळण, जात्यावरची गाणी वगैरे लोकसंगीताचे प्रकार आहेत.

लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी ४००० हून अधिक लोकगीते लिहिली आहेत आणि त्यातील भरपूर गाणी ही ग्रामीण भागातील विविध लोककलाकार गेली ४०-५० वर्ष सादर करीत आहेत[]. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाप्रकार असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी त्यांनी लावण्या, गण-गवळण, लोकगीते, असे मनोरंजनाच्या अनुषंगाने विविधांगी साहित्य निर्माण तर केलेच[][] [] आणि त्याचबरोबर 'प्रौढ साक्षरता अभियान', 'ग्राम स्वच्छता अभियान –स्वच्छ भारत', 'एड्स बद्दल जनजागृती', 'हुंडाबळीचे दुष्परिणाम', 'व्यसनमुक्ती’ अशा सामाजिक विषयांवर लोकगीते लिहून ती कलापथका च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात सादर केली आहेत[][]लोकभिमुख ग्रामीण भाषेचा बाज असलेल्या लिखाण शैलीमुळे त्यांचे साहित्य सामन्यांना सहज समजण्या जोगे आणि मनाला भावणारे असल्यामुळे लोकप्रिय झाले[].

जात्यावरची गाणी

1.घाना जी भरिला इडा जी ठेविला आदि-देव नमिला कुळूसुंबीला कुळूसुंबी आईन मंडपी याव चित्ताल कारान सिद्धी न्याव....

2.माझं जातं पाटा आहे, जन्माचा इसरा मला भेटला भाग्यवंत सासरा

3.मायबापानं देल्ल्या लेकी, वाटच्या गोसायाले नित पलंग बसायाले

4.मायबापानं देल्ल्या लेकी,

  नाही पाहिली जागाजुगा
  लेक लोटली चंद्रभागा

5.मायबापानं देल्ल्या लेकी,

  नाही पाहिले घरदार
  वर पाहिला सुंदर...


6.आली दिवाळी दसरा,

       मी माहेरा जाईन
       बंधु-भावाले ओवाळीन

वासुदेवाची गाणी

वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
जनामातेला काम भारी
घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

यावे यावे जगजेठी
तुमच्या नावाची आवड मोठी
खुटीला घालून मिठी

दोन बोलू सुखाच्या गोष्टी अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[]

गोकुळीचा चोर

गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥

अवचित कान्हा घरात शिरतो दही दूध तूप चोरूनी खातो धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥

पाण्यासी जाता घागर फोडी भर रस्त्यावर पदराला ओढी लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥

मुरलीधर हा नटखट भारी खट्याळ काळा कृष्ण मुरारी सोडू नका याला आता सोडू नका याला चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥

उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी

माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी

पोथी पुस्तक  वाचताना  बाई कानीचा डूल हाले

सावळा बाळराजा सये कागद संग बोले

सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग

इंद्रसभेचा सोनार ग  हरी घडविता झाला दंग

काळी चोळी , मोती जाळी

हार गुंफी गळया घाली

काळी करटूली कारली

वटी मैनाची भरली

आमी गौळणी बायका


इंद्रावनी गोष्ट  सांग

दिल्लीच्या नायका

झाडावरी मोर काय

बोलतो ऐका चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.

पोतराजाची गाणी

सोमवार आला, बेल दुरडी शंकराला, बेल सांबाला वाहिला
सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला
माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला

पोतराज गाणी:-

"आली आली मरीबया हिचा कळंना अनुभव| भल्या भल्यांचा घेती जीव|| आली आली मरीबया हा का सुटलासा वारा| दुनिया कापती चळचळा||"

पोतराज गाणी:-

लखामाई तू माझी आई ग दर्शना आलो घाई घाई ।।धृ ।। तुझ्या ग एडापाई मी पोतराज झालो तूझ्याग साठी मी पाई पाई आलो || लखमाई तू माझी आई ग

दर्शना आलो घाई घाई ।। 

दुःख दारिद्र्य ईडापीडा टळू दे वंदन करितो आई मला दर्शन दे, लखमाई तू माझी आई ग

दर्शना आलो घाई घाई ।।

तुझच लेकरू मी तुझा ग पोतराज मारतोया हाका माझी आई लखमाई ग दर्शना आलो घाई।। खण ग आणलंय सोबतीला लिंबु ग ठेवल आरतीला , लखमाई तू माझी आई ग दर्शना आलो घाई घाई ।। नाव तुझं घेऊनी

आनंद होई भक्ताच्या मनी

तुजी वटी भरतो खण नारळानी रमुनिया जाते लखमाई माझे ध्यान, किती गाऊ तुज गुणगान,

दर्शना आलो घाई घाई 

माझी ऐक हाक लखामाई , तू ऐक माझी हाक तुझ्याग पायावरी घासतोय नाक, लखमाई तू माझी आई ग

दर्शना आलो घाई घाई ।।

माझे आई तुझं गाईन गुणगान बाळ गोपाळ नांदू दे आनंदान, ईडपीडा टळूदे

दुसरं मागत नाई काई
दर्शना आलो घाई घाई||

भीमगीते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चचलेल्या गितांना भीमगीते असे म्हणतात. मराठी भाषेत असंख्य भीमगीते गायली गेली आहेत. इतर अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा भीमगीतांती रचना झालेली आहे.

धनगराची गाणी (सुंबरान)

पहिले माझे नमन गणपती देवाला |
सुंबरान मांडलं पहिलं माझं ||
सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |
धरतीमातेला मेघराय पित्याला |
मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |
चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला| ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला
गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला |
जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं
पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर ||

गाडी घुंगराची

लगबग लगबग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली बाई थोरल्या भायाची

सासू सासरे प्रेम आई बाबा वाणी घरामध्ये सुख राजाची ग राणी हाऊस मला मोठी घड पायाच गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची दोन

जागुनी रावळी धरून मल्हारीची पाई गळ्यामध्ये भंडारा आशिष गाणी घाई आवड मला मल्हारीचे गीत गाया चि गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गड जेजुरी जायाचि

कोकणी गाणी

आगरान गरा कय गा बाजा वाजत स्वाच्या घोड्याची पावूला वाजतान || सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||[१०]

कोजागिरीची गाणी

पडलं टिपूर चांदण | शोभिवंत झालं माझ्या दारीच अंगण | चांदनं टिपूर पुनवेच | सोबतीला आलं रूप श्रीकृष्ण देवाचं ||[११]

मोटेवरची गाणी

सर्ज्या अर्ज्या भूल्या नागा कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड फुल्या भारता नांदुक्र्या वड ये ||[१२]

पावसाची गाणी

पाऊस पडूनी पडयीनी गं| झाली जमीन वजनदार |ऐक लाडके गडयीनी गं| मला सख्याचा माझ्या हिरवा||[१३]

भरली चंद्रभागा | पाणी शिरलं गावात |पांडुरंग ये धावत || भरली चंद्रभागा| नाव झालीया नवरी |शेला गोताचा आवरी || भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा || भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी || भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||[१४]

  • सासर -माहेर विषयक मराठी व अन्याप्रांतीय लोकगीते -

भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला
भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला
भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट
भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट[१५]

चित्रदालन

हे सुद्धा पहा

  • भोंडल्याची गाणी

एक होता राजा- डॉ. सरोजिनी बाबर

लोकसंगीत - डॉ.सरोजिनी बाबर

संदर्भ

  1. ^ लोकसंगीत – डॉ. सरोजनी बाबर
  2. ^ “अवलिया लोकसाहित्यीक”, "दै. सकाळ”, पुणे, 21-Nov-2021.
  3. ^ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान "दै.लोकमत”,पुणे, 12-Nov-2021
  4. ^ "बी. के. मोमीन कवठेकर - लोकसाहित्याचा वारसा पुढे नेणारा लोकशाहीर", “दै. पारनेर दर्शन", १३-नोव्हेंबर-२०२३
  5. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”
  6. ^ “मोमीन यांनी समाजच्या वेदना साहित्यातून मांडल्या - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै. पुण्यनगरी", पुणे, 23-Nov-2021.
  7. ^ “बहूआयामी साहित्यिक मोमीन कवठेकर: डॉ शेळके”, "दै. पुण्यनगरी”, पुणे, १३-नोव्ह-२०१०.
  8. ^ "लोककला जिवंत ठेवणारी लेखणी विसावली", ‘दै. लोकमत- पुणे’, दि. १४-नोव्हेंबर-२०२१
  9. ^ 'एक होता राजा' (सरोजिनी बाबर
  10. ^ एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी
  11. ^ लोकसंगीत डॉ. बाबर सरोजिनी
  12. ^ एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी
  13. ^ लोकसंगीत डॉ. बाबर सरोजिनी
  14. ^ लोकसंगीत, डॉ. बाबर सरोजिनी
  15. ^ जा माझ्या माहेरा - सरोजिनी बाबर