लॉर्ड कॅनिंग
चार्ल्स कॅनिंग, पहिला अर्ल कॅनिंग तथा लॉर्ड कॅनिंग किंवा व्हायकाउंट कॅनिंग (१४ डिसेंबर, १८१२:ब्रॉम्पटन, लंडन, इंग्लंड - १७ जून, १८६२:ग्रॉसव्हेनर स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल[१] आणि व्हाइसरॉय[२] होता. हा १८५७ च्या स्वातंत्रयुद्धादरम्यान गव्हनर जनरल पदावर होता.
याच्या सद्दीदरम्यान मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिककाळातील पहिल्या तीन विद्यापीठांची स्थापना झाली.[३][४][५] लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात प्रस्तावित हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा याने पारित केला.[६][७] याचबरोबर लॉर्ड कॅनिंगने भारतीय पीनल कोड अमलात आणला.[८]
१८५७ च्या युद्धानंतर त्याने सर्वसाधारण सैनिकांना माफी जाहीर केल्यामुळे याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही टोपणनाव मिळाले होते.
मागील: लॉर्ड डलहौसी | भारताचे गव्हर्नर जनरल इ.स. १८५६ – इ.स. १८५८ | पुढील: पद रद्द |
मागील: नवीन पद | वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय इ.स. १८५८ – इ.स. १८६२ | पुढील: एल्गिनचा अर्ल |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Raman, Praveen (2017). Canning. Praveenraman.
- ^ "Proclamation by the Queen in Council to the Princes, Chiefs and people of India". British Library. 1 November 1858. 2021-10-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Edward Thompson; Edward T. & G.T. Garratt (1999). History of British Rule in India. Atlantic Publishers & Dist. pp. 472–. ISBN 978-81-7156-804-8. 9 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Sheshalatha Reddy (15 October 2013). Mapping the Nation: An Anthology of Indian Poetry in English, 18701920. Anthem Press. pp. 28–. ISBN 978-1-78308-075-5. 9 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Augustine Kanjamala (21 August 2014). The Future of Christian Mission in India: Toward a New Paradigm for the Third Millennium. Wipf and Stock Publishers. pp. 76–. ISBN 978-1-62032-315-1. 9 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Mohammad Arshad; Hafiz Habibur Rahman (1966). History of Indo-Pakistan. Ideal Publications. p. 316. 10 December 2018 रोजी पाहिले.
- ^ Nusantara. Dewan Bahasa dan Pustaka. 1972. p. 233. 10 December 2018 रोजी पाहिले.
- ^ O. P. Singh Bhatia (1968). History of India, 1857 to 1916. S. Amardeep Publishers. pp. 27–28. 10 December 2018 रोजी पाहिले.