लॉरा बासी
लॉरा बासी | |
---|---|
जन्म | २९ नोव्हेंबर, इ.स. १७११ |
मृत्यू | २० फेब्रुवारी, इ.स. १७७८ |
राष्ट्रीयत्व | इटालिअन |
पेशा | अध्यापन, संशोधन |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १७३२ - इ.स. १७७८ |
धर्म | ख्रिस्ती |
लॉरा मारिया कॅटरीना बासी (२९ नोव्हेंबर, इ.स. १७११- २० फेब्रुवारी, इ.स. १७७८) ह्या इटलीच्या भौतिकविद होत्या. युरोपीय विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री अध्यापक होत्या.[१]
आत्मचरित्र
लॉरा ह्यांचा जन्म बोलोग्ना येथे झाला.त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिली होती.त्यांचे खाजगी शिक्षण ७ वर्ष झाले. गेतानो तकॉनी ह्या त्यांच्या शिक्षिका होत्या. त्या विद्यापीठात अध्यापिका होत्या. जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास या विषयांचे अध्यापन त्या करीत. कार्डिनल प्रॉस्परो लँबर्टिनी ह्यांनी तिला खूप प्रोत्साहित केले.
इ.स. १७३१ मध्ये बोलोग्ना विद्यापीठात वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना शरीररचनाशास्त्र ह्या विषयाच्या अध्यापिका म्हणून त्यांची निवड झाली होती. इ.स. १७३२ मध्ये "अकॅडेमी ऑफ द इंस्टिट्यूट फॉर सायन्सेस"मध्ये त्यांची निवड झाली व पुढच्याच वर्षी त्यांना तत्त्वज्ञान ह्या विषयाचे अध्यापकपद मिळाले. इ.स. १७३८ साली त्यांचा विवाह जिसप वेरात्ती या सह-अध्यापकासोबत झाला. या दांपत्याला बारा अपत्ये झाली.[२]
न्यूटनप्रणित भौतिकीत लॉराला प्रामुख्याने रस होता आणि ह्या विषयावर तिने २८ वर्षे अध्यापन केले. भौतिकशास्त्र व नैसर्गिक तत्त्वज्ञान याबाबतचे न्यूटनचे विचार इटलीमध्ये आणण्यात तिचा मुख्य सहभाग होता. भौतिकशास्त्राच्या सर्व अंगांमध्ये तिने स्वतःहून अनेक प्रयोग केले. आपल्या आयुष्यकाळात तिने २८ शोधनिबंध प्रकाशित केले, कोणत्याही पुस्तकाचे लेखन मात्र तिच्याकडून झाले नाही.
इ.स. १७४५ मध्ये लँबर्टिनीने (आताचे चौदावे पोप बेनडिक्ट) तत्कालीन २५ निवडक विद्वानांचा गट बनविला होता. या गटात निवड व्हावी म्हणून लॉराने बरेच प्रयत्न केले, अकॅडमी वर्तुळात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर गटातील एकमेव महिला सदस्य म्हणून तिची निवड झाली.
सन्मान आणि पुरस्कार
शुक्र ग्रहावरील ३१ किमी व्यासाच्या एका विवराला लॉराचे नाव देण्यात आले आहे.[३] बोलोग्नामध्ये तिच्या नावाचे एक विद्यालय व रस्ता आहे.