Jump to content

लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी

लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी
आयुष्य
जन्म स्थान हुइकाप , मणिपूर , भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी या मणिपूर मधील विणकर आणि उद्योजक आहेत ज्या पारंपारिक मणिपुरी हातमाग आणि हस्तशिल्पांमध्ये विशेष आहेत. विणकाम कलेतील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[]

जीवन परिचय

सुबादानी यांचा जन्म हुइकाप, मणिपूर येथे लायतोंजाम नवा आणि सनाहन्बी यांच्या पोटी झाला. तिचे वडील नवा हे व्यवसायाने सुतार होते तर आई सनाहन्बी नंतरच्या काळात भाजीविक्रीकडे वळण्यापूर्वी छोट्या व्यवसायात गुंतलेली होती. सुबदानीचे प्राथमिक शालेय आंद्रो हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीपर्यंत झाले आणि नंतर ती अंगथा हायस्कूलमध्ये स्थलांतरित झाली जिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने शाळा सोडली. वयाच्या अठराव्या वर्षी तिचा विवाह लांगपोकलाकपम इबोपिशक या सरकारी कर्मचाऱ्याशी झाला.[]

कारकिर्द

वयाच्या १० व्या वर्षी तिने विणकाम करण्यास सुरू केले. तिच्या लग्नानंतरही तिने तिने हे काम पुढे सुरूच ठेवले, मुख्यतः खुदई, फाणेक आणि वांगखेई फी या प्रकाराची बनवते. सुबदानी यांनी १९९८ च्या दशकात एक सहकारी संस्था स्थापन केली आणि महिला विणकर विणकाम करू शकतील आणि त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडू शकतील असा उपक्रम सुरू केला. तिने स्वतः विणकरांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. १९९२, १९९३ आणि १९९८ मध्ये इम्फाळ येथे राज्य आणि केंद्रीय हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनातील प्रथम पारितोषिकांचीही ती विजेती होती. टेक्सटाईल डिझायनिंगमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुबदानीला १९९३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पारंपारिक हातमाग कलात्मक कापड, निंगखम समजिन डिझाइनच्या विकासात योगदान दिल्याबद्दल तिला २०११ मध्ये संत कबीर पुरस्कार मिळाला.[] विणकाम कलेतील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Full list of Padma awardees 2018". thehindu.com (English भाषेत). 25 January 2018. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Langpoklakpam Subadani Devi-Entrepreneur". e-pao.net (Manipur Online Newspaper) (English भाषेत). 12 June 2007. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Sant kabir Awardees" (PDF). handloom.nic.in (English भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Padma Awardees" (PDF). Padma awards.gov.in (English भाषेत). 12 March 2023. 12 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 12 March 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)