लेसोथोचा तिसरा लेत्सी
तिसरा लेत्सी (१७ जुलै, १९६३:मोरिजा, लेसोथो - ) हा लेसोथोचा राजा आहे. हा १९९०पासून राजेपदावर आहे. १९९०मध्ये याचे वडील मोशूशू दुसरा पदभ्रष्ट झाल्यावर लेत्सी सत्तेवर आला. १९९५मध्ये मोशूशू पुन्हा एकदा राजा झाला परंतु १९९६मध्ये झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर लेत्सी पुन्हा राजा झाला. याचे मूळ नाव डेव्हिड मोहाटो बेरेंग सीइसो आहे.
लेत्सी वैधानिक राजा असून त्याच्या हातात जास्त अधिकार नाहीत.