Jump to content

लेवा पटेल

लेवा पटेल तथा लेवा पाटीदार ही भारतातील पाटीदार समुदायातील एक उपजात आहे. लेवा पटेल प्रामुख्याने गुजरातच्या काठियावाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.

गुजरात व्यतिरिक्त लेवा पाटीदार हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे देखील वसलेले आहेत. महाराष्ट्रात खानदेश-वऱ्हाडच्या सीमांत भागातील जळगाव जिल्हाच्या पूर्व भागात आणि बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात हा समुदाय वसलेला आहे. महाराष्ट्रात लेवा पटेलांना लेवा पाटील म्हणून ओळखले जाते.