Jump to content

लेड झेपेलिन

लेड झेपेलिन

लेड झेपेलिन
संगीत साधना
गायन प्रकार हार्ड रॉक, हेवी मेटल
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ इ.स. १९६८ - इ.स. १९८०

लेड झेपेलिन (इंग्रजी: Led Zeppelin) हा इ.स. १९६८ साली स्थापन झालेला एक इंग्लिश रॉक बँड होता. ह्या बँडमध्ये गिटारवर जिमी पेज, गायक रॉबर्ट प्लँट, बास व कीबोर्डवर जॉन पॉल जोन्स तर ड्रमवर जॉन बोनहॅम हे चार कलाकार होते.

१९७० च्या दशकात लेड झेपेलिनचे अनेक आल्बम प्रचंड यशस्वी झाले. १९७१ साली त्यांनी काढलेले स्टेअरवे टू हेवन (Stairway to Heaven) हे आजवरच्या सर्वोत्तम रॉक गाण्यांपैकी एक मानले जाते.

१९८० सालच्या जॉन बोनहॅमच्या मृत्यूनंतर हा बँड बरखास्त करण्यात आला. लेड झेपेलिन हा जगातील सर्वात कुशल व यशस्वी बँडपैकी एक आहे. आजवर त्यांच्या आल्बमच्या २० ते ३० कोटी प्रती विकल्या गेल्याचा अंदाज आहे. बीटल्सखालोखाल सर्वाधिक गाणी विकला गेलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा बँड आहे.

बाह्य दुवे